जीएसटी विभागाने धडाकेबाज कारवाई करत 2100 कोटींचा घोटाळा उघड केला आहे. या प्रकरणी आरोपी दिलीपकुमार तिब्रेवाल याला जीएसटी कायद्याचे उल्लंघन ...
जीएसटी विभागाने धडाकेबाज कारवाई करत 2100 कोटींचा घोटाळा उघड केला आहे. या प्रकरणी आरोपी दिलीपकुमार तिब्रेवाल याला जीएसटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याला कोर्टात हजर केले असता 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
आरोपी व्यक्ती दिलीपकुमार रामगोपाल तिब्रेवाल याने 30 वेगवेगळ्या कंपन्यांची नोंदणी केली होती आणि त्या नोंदणीचा वापर करून 2100 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोगस विक्री चलान जारी केले होते. हा प्रकार लक्षात येताचं जीएसटी विभागाने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला.