$type=ticker$snippet=hide$cate=0

31 डिसेंबरपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवला, ठाकरे सरकारचा निर्णय

  मुंबई : कोरोनाच्या जीवघेण्या फैलावामुळे महाराष्ट्रात 31 डिसेंबर 2020 पर्यंत लॉकडाउन  वाढवण्यात आला आहे. शुक्रवारी ठाकरे सरकारकडून हा आदेश ...

 


मुंबई : कोरोनाच्या जीवघेण्या फैलावामुळे महाराष्ट्रात 31 डिसेंबर 2020 पर्यंत लॉकडाउन  वाढवण्यात आला आहे. शुक्रवारी ठाकरे सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार असल्याची माहिती यातून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असल्यामुळे ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. 


दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचं समोर आलं. खरंतर, मिशन बिगेनच्या अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर वाढला. यामुळे संसर्गाने पुन्हा फैलाव सुरू केला आहे. यामुळे 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यासाठी कठोर नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे.


खरंतर, देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडूनबुधवारी देण्यात आली होती. केंद्राकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले. 


केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे:


* सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक


* सामाजिक अंतर राखणं गरजेचं


* सतत हात धुणे आवश्यक


* चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी


* जलतरण तलावात एकावेळी एकाच खेळाडूला परवानगी


* धार्मिक कार्यक्रम, खेळ यासाठी मोकळ्या मैदानात 200 जणांना परवानगी


* बंद मोठ्या सभागृहात 100 जणांना परवानगी

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5584,letest News,590,Loksabha-2019,164,Maharashtra,118,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,22,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10052,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4203,नाशिक,780,पुणे,627,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15570,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12681,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3172,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: 31 डिसेंबरपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवला, ठाकरे सरकारचा निर्णय
31 डिसेंबरपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवला, ठाकरे सरकारचा निर्णय
https://d35y6w71vgvcg1.cloudfront.net/media/2020/09/thackeray-government-wants-to-do-all-the-work-in-marathi-language_730X365.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/31_27.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/31_27.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content