Breaking News

अयोध्येत 6 लाख दिवे लावून दीपोत्सव!

- गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये नोंद
- 6 लाख 6 हजार 569 लावल्या मातीच्या पणत्या

अयोध्या/ प्रतिनिधी

अयोध्येत शुक्रवारी भव्य-दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तब्बल 6 लाखांहून अधिक दिवे लावून योगी सरकारने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले. योगी सरकारने केलेल्या वक्तव्यामध्ये असे म्हटले होते की, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ च्या प्रतिनिधींनी अयोध्येतील हा भव्य स्वरूपातील दीपोस्तव पाहिला. यावेळी 6 लाख 6 हजार 569 मातीच्या पणत्या लावण्यात आल्या. अशाप्रकारचा भव्य दीपोत्सव अयोध्येत साजरा होत असल्याने अयोध्याने रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदविले आहे.