सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मध्ये सिडनी ग्राऊंडवर पहिला एकदिवसीय सामना पार पाडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 66 रन्सनी मा...
सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी ग्राऊंडवर पहिला एकदिवसीय सामना पार पाडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 66 रन्सनी मात केली. त्यामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला 375 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र निर्धारित 50 षटकांमध्ये भारताला 8 विकेट्स गमावून 308 धावा करता आल्या.
375 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय चांगली झाली. सुरुवातीच्या पाच ओव्हरमध्ये भारताने 50 रन्स केल्या. परंतुला नंतर लागोपाठ अंतराने विकेट्स पडत असताना शिखर धवन आणि हार्दिक पांड्याने भारताचा डाव सावरला. शिखर धवनने 86 बॉलमध्ये 74 रन्स केल्या. तर हार्दिक पांड्याने बहारदार खेळी करताना 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 76 बॉलमध्ये 90 धावा फटकावल्या.
शिखर-हार्दिक खेळपट्टीवर असताना भारताच्या विजयाच्या आशा होत्या. मात्र शिखर आऊट झाल्यानंतर चुकीचा फटका मारुन पांड्याही बेलबाद झाला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याने आपली विकेट्स चुकीचा फटका मारुन ऑस्ट्रेलियाला बहाल केली.
भारतीय कर्णधार विराट कोहली, मयांक अग्रवाल, के एल राहुल, श्रेयश अय्यर मोठी खेळी उभारण्यात अपयशी ठरले. मयांक 22, कोहली 21, श्रेयस 2, तर राहुल 12 धावा काढून तंबूत परतले. 375 धावांच्या डोंगराचा पाठलाग करत असताना साहजिक खेळाडूंवर दडपण आलं होतं. हेच दडपण पांड्या आणि शिखर धवन वगळता दुसऱ्या खेळाडूंना झुकारुन देण्यात अपयश आलं. सरतेशेवटी भारताचा 66 रन्सनी पराभव झाला.
ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅडम झम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर जोश हेजलवूडने 3 घेऊन त्याला सुंदर साथ दिली. मायकल स्टार्कने 1 विकेट्स घेतली.
तत्पूर्वी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याच्या अॅरॉन फिंचचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनी सार्थ ठरवला. कर्णधार अॅरॉन फिंच आणि स्टिव्हन स्मिथने दमदार शतके झळकावली तर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करत 19 बॉलमध्ये 45 धावा फटकावल्या. फिंच-वॉर्नर-स्मिथ आणि मॅक्सवेलच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचं लक्ष्य ठेवलं.