Breaking News

फक्त 799 रुपयांच्या हप्त्यावर घरी घेऊन जा 'टाटा'ची नवीन कार, ही आहे स्कीम..

 


देशात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली असून अशातच टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहनांना वित्त सुविधा देण्यासाठी एचडीएफसी बँकेशी करार केला आहे. कंपनीने या कराराच्या अंतर्गत वाहनांच्या अर्थसहाय्यासाठी दोन योजना सुरू केल्या आहेत.

टाटा मोटर्स ईएमआय योजना

टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांना वित्तपुरवठा करण्यासाठी एचडीएफसी बँकेशी करार केला आहे. यासाठी कंपनीने दोन योजना सुरु केल्या आहेत. टाटा मोटर्सने म्हटले आहे की, सणाच्या हंगामात एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने विक्री वाढविण्यासाठी 'ग्रॅज्युएट स्टेप अप स्कीम' आणि 'टीएमएल फ्लेक्सी ड्राइव्ह स्कीम' या दोन नवीन योजना सुरू करण्यात आली आहेत.

779 रुपयांच्या हप्त्यावर खरेदी करता येईल कार

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 'ग्रॅज्युएट स्टेप अप स्कीम'च्या अंतर्गत ग्राहक दरमहा किमान 799 (प्रति लाख) रुपयांच्या हप्त्यावर वाहन खरेदी करू शकता. ईएमआय वाहनाच्या मॉडेल आणि व्हेरिएंट अवलंबून असेल. खरेदीदाराच्या सोयीनुसार मासिक हप्त्या दोन वर्षानंतर हळूहळू वाढवला जाईल. तसेच 'टीएमएल फ्लेक्सी ड्राइव्ह स्कीम'च्या अंतर्गत ग्राहकांना वर्षाचे असे तीन महिने निवडायचे आहेत, ज्यात ते जास्तीत जास्त हप्त्याची रक्कम भरू शकतात.