Breaking News

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण 94 टक्केरत्नागिरी :

 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आजपर्यंत 8060 जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 94.47 टक्के आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 318 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 3.72 टक्के आहे. ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 8531 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यापैकी 8060 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मे महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत गेला.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यामध्ये माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहिम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा शोध घेण्यात आला. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली. पूर्वी 100 ते 150 रुग्ण सापडत होते. तो आकडा आता पाच ते सहावर येऊन पोहोचला आहे.