Breaking News

नागरिकांनी उपोषणाचा इशारा देताच पारनेर नगर पंचायत प्रशासनाला आली जाग.

नागरिकांनी उपोषणाचा इशारा देताच पारनेर नगर पंचायत प्रशासनाला आली जाग.
-----------------
तुर्तास जुण्या लाईनची तात्काळ दुरुस्ती करून लवकरच नवीन प्रलंबीत काम सुरु करनार. 
-----------------
 उपोषणाचा निर्णय मागे घ्यावे असे मुख्याधीकार्यांनी दिले लेखी निवेदन.


पारनेर प्रतिनिधी : 
    पारनेर शहरामध्ये चौरे आंबे वस्तीवर जलवाहिनी मंजूर असताना कार्यवाही न झाल्यामुळे नगरपंचायत ला वेळोवेळी याबाबत विचारणा केली मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले म्हणून श्रीकांत चौरे व समीर आंबे यांनी उपोषण करण्याचा इशारा नगरपंचायत चा दिला त्यावर मुख्याधिकारी यांनी यांनी जुन्या लाईनची तत्काळ दुरुस्ती करून लवकरच नवीन प्रलंबित काम सुरू करू असे लेखी पत्र श्रीकांत चौरे यांना दिली आहे. त्यामुळे उपोषणाचा इशारा देताच नगरपंचायत प्रशासनाला जाग आली आहे.
 शहरांमधील चौरे-आंबे वस्तीवर जलवाहिनी मंजूर असताना कार्यवाही न झाल्याबद्दल श्रीकांत चौरे व समीर आंबे यांनी गेले अनेक महीने लेखी व तोंडी स्वरूपात नगरपंचायत प्रशासनाला विनंती केली होती.व त्या संधर्भात प्रभाग क्र. ९ मधील पाण्यापासुन वंचित असनाऱ्या नागरीकांचे सह्यांचे निवेदही सुपुर्द केले होते.परंतु त्याकडे जानीव पुर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते.सदर आंबे,चौरे व गायकवाड वस्तीला गेले अनेक वर्षे पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही तरीही नगरपंचायत प्रशासन या वस्तीवर पाणीपट्टी वसुली साठी येत आहेत.त्या संदर्भात वारंवार विचारणा करूनही दुर्लक्ष करण्यात आले. नगर पंचायत कर वसुली करते तर नागरी सुविधा देणे क्रमप्राप्त व पाईपलाईन मंजूर आसताना जाणिव पुर्वक दुर्लक्ष केल्यामुळे श्रीकांत चौरे,समीर आंबे यांनी वंचित प्रभाग क्र. ९ चे अमित जाधव,किरण सोनवणे,सुधीर सोनवणे,विनायक सोनवणे,जीवन घंगाळे,योगेश कांबळे,साईनाथ धोत्रे  यांच्या सह शहरातील नागरिकांनी अमरण उपोषण करण्याचे लेखी निवेदन नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सौ. सुनिता कुमावत यांना देण्यात आले होते.
      उपोषणाच्या ईशाऱ्या नंतर मुख्याधिकारी यांनी लेखी निवेदनात असे नमूद केले की नगरपंचायत सर्वसाधारण सभा दि.१९ ऑगस्ट रोजी ठराव केला व ८ दिवसात दलित वस्ती निधी असून सदर काम मंजुरी देण्यात आलेली असून सहाय्यक संचालक नगर रचना यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.परंतु जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांचे पत्र दि . १९ ऑक्टोबर नुसार सदर निधी खर्च करण्याची मुदत ३१मार्च रोजी संपली असल्याने पुढील सर्वसाधारण सभेमध्ये १४ वा वित्त आयोग अबंधनकारक निधीतून घेण्यासाठी विषय समाविष्ट करण्यात येईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.तसेच तो पर्यंत सध्या अस्तित्वात असलेली पाइपलाइनची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल तरी आपण या उपोषणा पासून परावृत्त व्हावे अशी विनंती, अर्जदार श्रीकांत चौरे,समीर आंबे व प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांना केली व त्या आशयाचे लेखी पत्र श्रीकांत चौरे व नागरीकांकडे सुपुर्द करण्यात आले. व जाहीर केलेले उपोषण मागे घेणे बाबत विनंती केली.