Breaking News

पारनेर तालुक्यात काल दोन अहवाल पॉझिटिव्ह.

पारनेर तालुक्यात काल दोन अहवाल पॉझिटिव्ह.
--------------–
रुग्ण संख्या कमी होत आहे ही समाधानाची बाब तालुक्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे.


पारनेर प्रतिनिधी-  पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे काल दि.१ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार तालुक्यात फक्त दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्राप्त झालेल्या कोरोना चाचणीच्या पॉझिटिव अहवाला मध्ये जवळा व देवीभोयरे येथे प्रत्येकी एक व्यक्तीला कोरोना ची लागण झाली आहे तालुक्यात याव्यतिरिक्त पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे तालुक्यासाठी ही दिलासादायक बाब आहे गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात रुग्ण संख्याही झपाट्याने कमी होताना दिसत आहे त्यामुळे आरोग्य विभागावर गेल्या अनेक महिन्यापासून आलेला ताण कमी झाला आहे.
रुग्ण संख्या कमी होत असली तरी या महिन्यांमध्ये दिवाळी हा सण आहे त्यानिमित्त बाजारपेठांमध्ये अनेक जण गर्दी करत आहेत येथे आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे मास्क सॅनिटायझर नियमित वापर केला तर निश्चित कोरोना ला दूर ठेवले जाऊ शकते त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होणे गरजेचे आहे रुग्ण संख्या कमी होत असल्यामुळे येत्या काही दिवसातच तालुका पूर्णपणे कोरोना मुक्त होऊ शकतो.