$type=ticker$snippet=hide$cate=0

पतीच्या आत्महत्येमुळे विधवा झालेल्या महिलेचीही आत्महत्या

  पतीच्या आत्महत्येमुळे विधवा झालेल्या महिलेचीही आत्महत्या रावेर : शहरातील जुना सावदा रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील रहिवासी असलेली विधव...

 

पतीच्या आत्महत्येमुळे विधवा झालेल्या महिलेचीही आत्महत्या

रावेर : शहरातील जुना सावदा रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील रहिवासी असलेली विधवा महिला भारती दिनेश चौधरी (वय ४२) यांनी त्यांचे वरच्या मजल्यावरील राहत्या घरात गळफास घेऊन सकाळी सात वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत रावेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ रहिवासास असलेल्या विधवा महिला भारती दिनेश चौधरी (वय ४२) यांनी त्यांचे वरच्या मजल्यावरील राहत्या घरात छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन सकाळी सात वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना समोर आली. सदर महिलेचे सासरे लग्न सोईरीकच्या कामासाठी बाहेरगावी जाण्याचे तयारीत असताना ते बाहेरून घरी आल्यानंतर त्यांना सुनबाईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समजली. सदर विधवा महिलेचे पती दिनेश चौधरी यांनीही १३ते १४ वर्षांपुर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या कटू स्मृतींना आप्तेष्टांकडून यावेळी व्यक्त झाल्या. पतीच्या निधनानंतर हलाखीची परिस्थिती असताना एकूलता एक मुलगा कुणाल (वय १९) याचा सांभाळ करून त्यांनी आपली गुजराण सुरु ठेवली होती. तर सदर विधवा महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मृत महिलेचे दीर अनील सखाराम चौधरी यांनी खबर दिल्यावरून रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत महिलेच्या माहेरातील मंडळीने ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात एकच आक्रोश केला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी शवविच्छेदन केले. रावेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र सुरवाडे हे पुढील तपास करीत आहेत.
Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5573,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,14,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10037,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,667,देश,4194,नाशिक,779,पुणे,623,बीड,1425,बुलडाणा,3,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15531,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12642,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3479,विदेश,637,संपादकीय,1477,सातारा,3169,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पतीच्या आत्महत्येमुळे विधवा झालेल्या महिलेचीही आत्महत्या
पतीच्या आत्महत्येमुळे विधवा झालेल्या महिलेचीही आत्महत्या
https://assets-news-bcdn.dailyhunt.in/cmd/resize/400x400_80/fetchdata16/images/66/71/0f/66710f499478a6e408bd00829c130da0637cf698f8bee44eb5ef4d6dd7843c21.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_101.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_101.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content