Breaking News

कोविड ची टेस्ट करण्यासाठी शिक्षकांची रांग, पण..

 

माखजन । वार्ताहर
२३ नोव्हेंबर पासून ९वी ते १२ची वर्ग सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.या पार्श्वभूमीवर शिक्षकांनाची आर टी पी सी आर टेस्ट करणे अनिवार्य आहे.यामुळे सध्या सगळ्या तालुक्यात कोविड टेस्ट सेंटर वर शिक्षकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.परंतु शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरू करताना विद्यार्थ्यांची कोणतीच चाचणी होणार नसल्याने सरकारी धोरणाविषयी नाराजीचे सूर उमटत आहेत.

शाळेच्या आवारात सुमारे ५% शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असतात व बाकी जवळपास९५%विद्यार्थी असतात.शाळा चालू करताना पालकांच्या हमीपत्रावर विद्यार्थी शाळेत येतील पण विद्यार्थी कोरोना बाधित आहे की नाही याची खातराजमा कशी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.शाळाचालू करताना विद्यार्थ्यांच्या देखील कोविड टेस्ट करा अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.शिक्षक -विदयार्थी संपर्कापेक्षा विद्यार्थी-विद्यार्थी संपर्क अधिक असतो.यामुळे विद्यार्थ्यांची कोविड टेस्ट करण्यात यावी अशी आग्रही मागणी होत आहे.

संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या कोरोना चाचणी घेतली जात आहे.परंतु एकाच बेड वर सॅनिटायझेशन न करता व्यक्तींना झोपवले जात आहे.अश्या पद्धतीने टेस्ट करायला आलेल्या संबंधित व्यक्ती व शिक्षकांना बाधा झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

थंडीत कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ होईल का ?