Breaking News

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट.
---------------
दोघांमध्ये सुमारे एक तास अनेक विषयावर झाली चर्चा.
---------------
अण्णा हजारे यांच्या कामाबाबत जिल्हाधिकार्‍यांनी घेतली माहिती अण्णांनी केले जिल्हाधिकार्‍यांच्या यापूर्वीच्या कामाचे कौतुक.



शशिकांत भालेकर/पारनेर : राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे आले होते अण्णा हजारे यांच्यासोबत त्यांनी विविध विषयांवर सुमारे तासभर चर्चा केली.
    राळेगणसिद्धी येथे दि. १ रोजी ५.३० वाजता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी अण्णांच्या तब्येतीची विचारपूस केली नव्याने जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहे यावेळी अण्णा हजारे यांनी त्यांना सांगितले की अधिकार्‍यांच्या हातांमध्ये बऱ्याच गोष्टी असतात अधिकाऱ्यांनी ठरवले तर जनतेचे अनेक प्रश्न त्वरित मार्गी लागू शकतात तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये सेवेची चांगली संधी आहे.


यावेळी अण्णांनी केलेल्या आंदोलनाचे स्वरुप त्या आंदोलनाला मिळालेले लोकांचे प्रेम महाराष्ट्रा सोबतच देशभरातील जनतेने यांना दिलेला पाठिंबा या विषयावर चर्चा झाली यावर अण्णांनी सांगितले लोकपाल विधेयक हा झालेला निर्णय क्रांतिकारी आहे माहितीचा अधिकार कायद्यासंदर्भात तसेच तो रद्द होऊ नये. म्हणून केलेले प्रयत्न आळंदी आंदोलनाबाबत अशा अनेक विषयावर मनमोकळेपणाने दोघांमध्ये तासभर चर्चा झाली अण्णांनी जिल्हाधिकारी यांच्या या पूर्वीच्या कार्यकाळाबाबत जाणून घेतले व तेथे केलेल्या चांगल्या कामाबाबत देखील कौतुक केले. 
असेच काम यापुढे या जिल्ह्यांमध्ये सुरू ठेवा असे अण्णा हजारे यांनी यावेळी म्हटले राळेगण सिद्धी येथील झालेल्या पाणलोटाच्या कामांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली माथा ते पायथा काम कसे केले गेले याविषयी जिल्हाधिकारी यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी तहसिलदार ज्योती देवरे राळेगण-सिद्धी चे माजी सरपंच जयसिंग मापारी दत्ता आवारी आदी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सोबत अण्णा हजारे यांनी मनमोकळेपणाने सुमारे एक तास चर्चा केली. त्यानंतर अण्णांनी स्वतःहून त्यांना गाडीपर्यंत सोडले व त्यांनी यापूर्वी केलेल्या कामांची प्रशंसा केली व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.