Breaking News

मुकेश अंबानींकडून मोदींची 'तारीफ'

 

PM मोदींच्या 'धाडसी सुधारणा' पासूनच निघेल देशाच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग, मुकेश अंबानींकडून मोदींची 'तारीफ'

गांधीनगर - रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी शनिवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या 'धाडसी सुधारणा' (Bold Reforms)ची प्रशंसा केली. यामुळे येणाऱ्या काही वर्षांत भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल, असे अंबानी म्हणाले. ते पंडित दीनदयाल पेट्रोलियम विद्यापिठाच्या (Pandit Deendayal Petroleum University- PDPU) दीक्षांत समारंभास व्हर्च्यूअली संबोधित करत होते.

अंबानी म्हणाले, "पंतप्रधान मोदींच्या दृढ आणि प्रभावी नेतृत्वाने संपूर्ण जगाला, भारताकडे एका नव्या नजरेतून पाहण्याची दृष्टी दिली आहे. त्यांच्या आत्मविश्वासाने आणि दृढ विश्वासाने संपूर्ण देशालाच पुढे वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले आहे. मला विश्वास आहे, की त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या 'धाडसी सुधारणा'पासूनच येणाऱ्या काही वर्षांत भारत केवळ वेगाने आर्थिक भरपाईच करणार नाही, तर आर्थिक प्रगतीचा मार्गही प्रशस्त होईल."

पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचे उदाहरण देत अंबानी म्हणाले, "आपल्या सर्वांनाच माहीत आहे, की पीडीपीयू हे माननीय पंतप्रधान नरेंद्र भाईंच्या ''आत्म निर्भर'' दृष्टीचेच एक प्रॉडक्ट आहे. ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी यासंदर्भात दृष्टीकोन दिला होता." ते म्हणाले, "पीडीपीयू केवळ 14 वर्षांपूर्वीचेच आहे. मात्र, तरीही ते नवकल्पनांसाठी अटल रँकिंग ऑफ इंस्टिट्यूशन्समध्ये टॉप-25मध्ये आहे."

देशातील ऊर्जेच्या आवश्यकतेवर बोलताना अंबानी म्हणाले, "ऊर्जेच्या भविष्यात अभूतपूर्व बदल होताना दिसत आहे. एवढेच नाही, तर याचा मानवाच्या भविष्यावरही मोठा प्रभाव पडत आहे. खरेतर यामुळे आपल्या ग्रहाचेही भविष्य प्रभावित होत आहे." यावेळी, "पर्यावरणाची हाणी केल्याशिवाय, आपण आपली अर्थव्यवस्था कायम ठेवण्यासाठी ऊर्जेचे अधिक उत्पादन करू शकतो?," असा प्रश्नही अंबानी यांनी केला. यावेळी अंबानी यांनी हवामान बदलावरही भाष्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पीडीपीयूच्या या आठव्या दीक्षांत समारंभात व्हर्च्यूअली संवाद साधला.