Breaking News

सातारातील आमदेवाड्यात होते बाबासाहेबांचे वास्तव्य!

- जागेचा योग्य भाव मिळाला की आम्ही बाहेर पडू; भविष्यात राष्ट्रीय स्मारक होईल!

- जागेच्या वारसदारांची माहिती

सातारा/ प्रतिनिधी

येथील प्रतासपसिंह हायस्कुलमध्ये डॉ. आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण घेतले होते. तेव्हा  ते आमदे वाड्यात राहत होते. तेव्हा त्या जागेचा योग्य भाव मिळाला. तर आम्ही बाहेर पडू, असे या जागेचे वारसदार उदय आमदे यांनी ज्येष्ठ पत्रकार अनिल वीर यांनी घेतलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. 

--
याच वाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहिले होते. त्याठिकाणी उदय आमदे यांच्याबरोबर चर्चा करताना अनिल वीर
--

सुमारे 30 गुंठे एवढी जमीन आहे. त्यातील 1980 साली कॅनॉलसाठी 8 गुंठे गेलेली आहे. सन 2004 साली काही खोल्यांची चाळ पाडल्याने समाज जागृत झाला होता. समाजाबरोबरच प्रशासन विचारू लागले. सध्या न्यायप्रविष्ट प्रश्‍न निर्माण झालेला आहे. कधी निकाल लागेल काहीही सांगता येत नाही. तत्पूर्वी प्रशासनाने आर्थिक तडजोड केली होती. मात्र, उदय आमदे यांच्या वडिलांना मान्य नव्हते. सध्या तेही हयात नाहीत. बाजूलाच माता भीमाईचे स्मारक होत आहे. त्यामुळे आपोआपच समाजाच्या नजरा आमदे वाड्याकडे वळल्या आहेत. तेव्हा प्रशासनाने आमदे परिवारास सखोल चौकशी करून डॉ. आंबेडकर राहत असलेली जागा ताब्यात घेऊन स्मारक, पुतळा व बाग निर्माण होईल, असे पहावे. त्यासाठी तेवढीच जागा व आर्थिक मोबदला आमदे परिवारास देण्यासाठी प्रयत्न करावा. याशिवाय, समाजातील घटकांनीही श्रेयवादाच्या लढाईत न पडता आपल्या पदरी कशी पडेल ? हे पाहिले पाहीजे. डॉ.आंबेडकर यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना जिथे राहिले होते. ते केंद्र सरकारने ताब्यात घेतले आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारने पुढाकार घेऊन आमदे वाडा ताब्यात घेऊन राष्ट्रीय  स्मारकाचा दर्जा द्यावा. अशी आग्रही मागणी समाजाच्यावतीने राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे संस्थापक अनिल वीर यांनी केली आहे.