Breaking News

रत्नागिरी कोल्हापुर महामार्गावरील दाभोळे येथे एस. टी. दुचाकी अपघातात दोघे जखमी

 देवरूख । प्रतिनिधी

रत्नागिरी कोल्हापुर महामार्गावरील दाभोळे टाक्याचा माळ येथे एस. टी. ने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. अपघात दुचाकीवरील दोनजण जखमी झाले असून उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एस. टी. चालकावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबत दुचाकी चालक अक्षय मधुकर पºहाड (रा. पुणे) याने खबर दिली आहे. अक्षय प-हाड हा आपल्या ताब्यातील पल्सर (एमएच-१२, एसएम- ६९५०) घेवून मित्र अनमोल काजरे याच्यासह पुण्याहून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. रत्नागिरी बसस्थानकाचे चालक राहुल राजेंंद्र मुंडे (रा.उस्मानाबाद) हे आपल्या ताब्यातील बस (एमएच-१३, सीयु- ७८३०) घेवून रत्नागिरीहून नांदेडच्या दिशेने जात
होते.

दाभोळे टाक्याचा माळ नित्यानंद हॉटेल नजीक असलेल्या वळणाचा अंदाज एस. टी. चालक राहुल मुंडे न आल्याने समोरून येणा-या दुचाकीला चुकीच्या बाजुला जावून धडक दिल्याचे फीर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

अपघातात अक्षय प-हाड व अनमोल काजरे हे जखमी झाले. प्रथम त्यांच्यावर साखरपा
प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातास कारणीभुत ठरल्याप्रकरणी एस.टी. चालक राहुल मुंडे यांच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेड काँन्स्टेबल संजय मारळकर करीत आहेत.