मुंबई : अभिनेता मुकेश खन्ना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहेत. कधी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तर कधी त्यांनी सहभाग ...
मुंबई :
अभिनेता मुकेश खन्ना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहेत. कधी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तर कधी त्यांनी सहभाग घेतलेल्या कार्यक्रमांमुळे. अलिकडेच मुकेश खन्ना यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’च्या ‘पूछता है भारत’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. मात्र, या लाइव्ह शोमध्ये त्यांना संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर त्यांनी शिवसेना नेते संजय गुप्ता यांनी खडे बोल सुनावल्याचं दिसून आलं.
‘पूछता है भारत’ हा कार्यक्रम सुरु असतान मुकेश खन्ना बोलत होते. मात्र, ते बोलत असताना संजय गुप्ता सातत्याने मध्ये बोलून व्यत्यय आणत होते. हे पाहिल्यानंतर मुकेश खन्ना यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी भर कार्यक्रमात त्यांना खडे बोल सुनावले. मी बोलत असताना मध्ये कोणी बोलायचं नाही, असं त्यांनी सांगितलं.
“मी काय म्हणतोय ते ऐका जरा. कोणी मध्ये बोलणार नाही. तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही जो कोणी मध्ये-मध्ये बोलत आहे त्यांनी जरा शांत बसा, तुमच्या विरुद्ध बोलत नाहीये. त्यामुळे जरा शांत बसा. तुम्ही कशाला मध्ये-मध्ये बोलताय”, असं मुकेश खन्ना रागात बोलले.