Breaking News

पारनेर नगरपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर !

पारनेर नगरपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर
-------  
 आरक्षण पथ्यावर न पडल्याने इच्छुकांचे मनसुबे धुळीस तर काहींना लॉटरी!
-------------
आरक्षणामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागात उलथापालथ.


पारनेर प्रतिनिधी- शहरातील नगरपंचायत निवडणुकीसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील स्त्रियांसाठी राखीव ठेवण्याच्या जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यामध्ये स्त्रियांच्या आरक्षणाच्या राखीव ठेवण्याच्या जागा व उर्वरित स्त्रियांसाठी राखीव ठेवण्याच्या जागा यांचे आरक्षण सोडत डॉ.आंबेडकर भवन पारनेर येथे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी डॉ सुनीता कुमावत यांच्या उपस्थित काढण्यात आली या सोडतीमध्ये पारनेर नगरपंचायतीचे सतरा प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले यात आरक्षण पथ्यावर पडल्यामुळे अनेक इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत तर काहींना लॉटरी लागली आहे.
नगरपंचायत नवीन आरक्षण पुढीलप्रमाणे-
प्रभाग क्रमांक १ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग( सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक २ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग(स्त्री राखीव)
प्रभाग क्रमांक ३सर्वसाधारण (स्त्री राखीव)
 प्रभाग क्रमांक ४सर्वसाधारण स्त्री/पुरुष
प्रभाग क्रमांक ५सर्वसाधारण स्त्री/पुरुष
प्रभाग क्रमांक ६ नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री राखीव)
प्रभाग क्रमांक ७ सर्वसाधारण स्त्री/पुरुष
प्रभाग क्रमांक ८ अनुसूचित जाती(सर्वसाधारण)
 प्रभाग क्रमांक ९ सर्वसाधारण (स्त्री राखीव)
 प्रभाग क्रमांक १० सर्वसाधारण स्त्री/पुरुष
प्रभाग क्रमांक ११ नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री राखीव)
प्रभाग क्रमांक १२ सर्वसाधारण स्त्री/पुरुष
 प्रभाग क्रमांक १३ सर्वसाधारण महिला राखीव
प्रभाग क्रमांक १४ नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
प्रभाग क्रमांक १५ सर्वसाधारण महिला राखीव
 प्रभाग क्रमांक १६ सर्वसाधारण (स्त्री राखीव)
 प्रभाग क्रमांक १७ सर्वसाधारण महिला राखीव
या नुसार आरक्षण जाहीर झाले आहे.
दरम्यान प्रभाग रचना देखील जाहीर झालेले आहेत प्रभाग क्रमांक ११,१२,१६ व १७ यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आला असून बाकी प्रभाग पूर्वीप्रमाणेच आहेत त्यामुळे चार प्रभाग वगळता इतर प्रभागातील इच्छुक व मतदारांवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही.


   पारनेर नगरपंचायत मध्ये असलेल्या १७ प्रभागांमध्ये आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला असून अनेकांना त्याचा फायदा तर अनेक इच्छुकांसाठी त्याचा फटका बसला आहे या आरक्षणामुळे काही इच्छुक उमेदवारांची दावेदारी संपुष्टात आली आहे तर काही इच्छुक उमेदवारांसाठी आरक्षण पथ्यावर पडले असल्याचे स्पष्ट झाले आहे महिला राखीव आरक्षण पडल्याने घरातील स्त्रियांना उमेदवारी द्यावी लागणार तर काही महिला नगरसेवकांच्या जागेवर खुले आरक्षण पडल्याने पतिराजांना संधी उपलब्ध झाली आहे.
 विद्यमान नगराध्यक्षा असणाऱ्या वर्षा नगरे यांच्या असणाऱ्या प्रभाग ९ मध्ये नागरिकांच्या सर्वसाधारण (स्त्री राखीव) साठी आरक्षण पडले आहे तसेच विद्यमान उपनगराध्यक्ष  दत्ता कुलट यांच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग(स्त्री राखीव) आहे.नगरसेवक चंद्रकांत चेडे यांचा प्रभाग ६ नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री राखीव) राहिलेला आहे माजी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांच्या प्रभागात अनुसूचित जाती(सर्वसाधारण) आहे.