Breaking News

पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले

पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले 
---------------
चोरीच्या सोने खरेदी प्रकरणात सोनाराकडून मागितली होती लाच 


संगमनेर/प्रतिनिधी :
संगमनेर शहरातील एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना, सोनाराकडे चोरीच्या सोने खरेदी केल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्याची भीती दाखवून लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला नाशिक येथील एसीबीच्या पथकाने पैशांसह रंगे हात पकडले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी असे त्या अधिकाऱ्याचे नाव असून आज मंगळवार दि.३  रोजी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हि कारवाई केली आहे. यावेळी तक्रारदार सोनाराकडून तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना परदेशी यांना पकडण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षकालाच लाच घेताना एसीबीने पकडल्यामुळे संगमनेर शहर पोलिसांची आब्रू चव्हाट्यावर आली आहे. तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी किती निर्ढावले आहेत याचे हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. एसीबीचे पथक आता यावर काय कारवाई करते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करायचे काम अद्याप सुरु आहे.