$type=ticker$snippet=hide$cate=0

अग्रलेख/ कुशल रणनीतीकार हरपले!

 अग्रलेख/  कुशल रणनीतीकार हरपले! काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पक्षाचे रणनीतीकार, स्वतःच्या चाणाक्ष बुद्धी व कर्तृत्वाने राजधानी दिल्लीच्या...

 अग्रलेख/ 

कुशल रणनीतीकार हरपले!


काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पक्षाचे रणनीतीकार, स्वतःच्या चाणाक्ष बुद्धी व कर्तृत्वाने राजधानी दिल्लीच्या राजकारणात स्वतःचा ठसा उमटविणारे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार  अहमद पटेल यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोविड-19 मुळे गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि देशाने एक कुशल राजकारणी गमाविला. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा मजबूत स्तंभच कोसळला आहे. गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ असलेल्या अहमद पटेल यांचे काँग्रेसमधील स्थान मोठे होते. पडद्यामागे राहून काँग्रेसचे राजकारण त्यांनी हाताळले. पंचायत समिती सभापतीपदापासून सुरु झालेला  अहमद पटेल यांचा राजकीय प्रवास काँग्रेसचे सगळ्यात मोठे संकट मोचक या बिरूदापर्यंत पोहोचला. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)चे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना मागेल ते मंत्रिपद मिळणार होते. परंतु, त्यांनी मंत्रिपदाचा मोह टाळून पक्ष संघटनेतच काम करणे पसंत केले. ते वयाच्या अवघ्या 26 व्यावर्षी ते लोकसभेत दाखल झाले होते. त्यानंतर ते कधीही गुजारातच्या प्रादेशिक राजकारणात परतले नाहीत. गांधी कुटुंबीयांच्या तीन पिढ्यांसोबत पटेल यांनी जवळून काम केले. अलिकडेच ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून पक्षात जबाबदारी सांभाळत होते. राजधानी नवी दिल्लीच्या वर्तुळात ही चर्चा कायम फिरली, की अहमद पटेलांच्या अचूक राजकीय सल्लागारीमुळेच  सोनिया गांधी भारतीय राजकारणात पाय रोवून उभ्या राहू शकल्या. पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर तसेच नरसिंह राव यांच्यासारख्या नेत्यांसोबतचे नाते बिघडल्यानंतरही सोनिया गांधी पक्षात टिकून राहिल्या; त्या केवळ पटेलांच्या राजकीय रणनीतीमुळेच. काँग्रेसच्या पडझडीच्या काळात व सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश घेतला होता. त्यानंतर अहमद पटेल हे नाव राजकारणात दिसू लागले. पटेल हे काही काँग्रेस पक्षाचे मास लीडर (जननेता) नव्हते; तरीही अत्यंत व्यामिश्र अशा काँग्रेस पक्षाची व या पक्षाच्या बड्या नेत्यांची ते नस ओळखून होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे रणनीतीकार म्हणून त्यांनी पडद्याआडून अनेक राजकीय खेळ्या खेळल्या होत्या. यूपीए सरकार सत्तेत असताना अनेक राजकीयदृष्ट्या  कठीण पेचप्रसंगातून त्यांनी काँग्रेसला वाचवले होते. त्यांच्या राजकीय चातुर्यामुळे ते सोनिया गांधी यांचे कायमचे विश्‍वासू सल्लागार म्हणून दोन दशके कार्यरत राहिले. सत्तेच्या जवळ असूनही पटेल यांनी स्वतःकडे मात्र कोणतेही प्रभावशाली पद घेतले नाही. काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होऊन राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आली तरी सोनिया गांधी यांचे ते राजकीय सल्लागार म्हणून कायम होते. काँग्रेस वर्तुळात ते सोनियानिष्ठ समजले जात असतं. त्यामुळे त्यांच्या निधनाने आपण एक विश्‍वासू सहकारी व मित्र गमावला अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली आहे. 2004 मध्ये यूपीए स्थापन करण्यामागे सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला होता; आणि हा प्रयोग सफल झाला तो अहमद पटेल यांच्या पडद्यामागील रणनीतीमुळे. पटेल यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी घनिष्ठ व मैत्रीचे संबंध होते. ते कठीण प्रसंगात कोणत्याही विरोधी पक्षाशी थेट संबंध साधू शकत होते. पटेल यांची राजकीय कारकीर्ददेखील तशी चमत्कारिकच राहिली आहे. आणीबाणीनंतर 1977 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. त्याच निवडणुकीत पटेल हे मात्र  संसदेत पोहोचले होते. पटेल यांनी भरूच लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत वयाच्या 26 व्यावर्षी लोकसभेत प्रवेश केला. 1980 व 1984 मध्येही त्यांनी भरूच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 1980 मध्ये जेव्हा काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तेव्हा इंदिरा गांधी यांनी पटेल यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी देण्याची तयारी केली. परंतु, त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद नाकारले व पक्ष संघटनेत काम करणे पसंत केले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. 1984 मध्ये काँग्रेसची सत्ता आली तेव्हाही  पटेल यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाची संधी चालून आली. मात्र, पटेल यांनी त्यावेळीदेखील केंद्रीय मंत्रिपद नाकारले व राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी युवक काँग्रेसचा विस्तार केला. त्याचबरोबर 1977 ते 1982 या काळात ते गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. एकीकडे मंत्रिपदासाठी वारंवार पक्ष बदलणारे नेते कुठे? आणि मंत्रिपद नाकारून पक्ष संघटनेत काम करणारे पटेल कुठे? 1985 ते 1986 या काळात पटेल हे काँग्रेसचे महासचिव होते. 1986 मध्ये ते गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. पुढे नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतर पटेल यांनी काँग्रेस कार्यकारिणीत घेण्यात आले. ते अखेरपर्यंत कार्यकारिणीचे सदस्य होते. 1996 मध्ये सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष असताना पटेल काँग्रेसचे कोषाध्यक्ष बनले. पुढे सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव व्ही. जॉर्ज यांच्याशी काही काळ संबंध बिघडल्याने पटेल यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांच्यावर सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार म्हणून जबाबदारी देण्यात आली. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करण्यास सुरूवात केल्यानंतर पटेल यांचे पक्षातील वजन वाढले. पटेल यांना काँग्रेसचे संकट मोचक म्हटले जाऊ लागले. गांधी कुटुंबीयांच्या सर्वात जवळ असलेल्या व्यक्तींच्या यादीत पटेल यांचे नाव अग्रभागी होते. स्वतःचे डोके अतिशय थंड ठेवत, पटेल यांनी काँग्रेसच्या राजकीय अडचणींच्या अनेक समस्या सोडविल्या. आणि, अनेकांचा राजकीय गेमदेखील त्यांनी अशाच थंड डोक्याने केला. 2004 ते 2014 या कालावधीत केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना अहमद पटेल यांच्या राजकीय वजनाचा सगळ्यांना अंदाज आला. फक्त पक्षाच्या निर्णयातच नाही, तर केंद्रापासून ते राज्यांमधील सरकार स्थापनेत पटेल यांची भूमिका महत्त्वाची असायची. त्या काळात अनेक नेत्यांचे राजकीय भवितव्य पटेल यांनी ठरविले. पक्षाच्या बैठकीत जेव्हा केव्हा सोनिया गांधी विचार करुन सांगू,  असे म्हणायच्या; त्यावेळी सगळ्यांना कळून चुकायचे की त्या अहमद पटेलांचा सल्ला घेऊन निर्णय घेणार आहेत. यूपीए-1 व यूपीए-2 सरकारच्या काळात घेण्यात आलेले अनेक निर्णयांच्या पडद्यामागे अहमद पटेल उभे होते. म्हणूनच पटेल हे काँग्रेस पक्षाचे मजबूत स्तंभ होते. अत्यंत कठीण परिस्थितीतही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले, ही व्यक्ती काँग्रेस पक्षाची संपत्ती होती. व्यक्तीशः दैनिक लोकमंथनची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

----------------

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5552,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,315,satara,5,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9985,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,661,देश,4154,नाशिक,776,पुणे,597,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15385,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12486,महाराष्ट्र सातारा,26,मुंबई,3446,विदेश,637,संपादकीय,1467,सातारा,3159,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अग्रलेख/ कुशल रणनीतीकार हरपले!
अग्रलेख/ कुशल रणनीतीकार हरपले!
https://lh3.googleusercontent.com/-kgTFZAncEOw/X74djQyU7LI/AAAAAAABlqE/ktzaFyhuIZgwNkSQ7u_8tKWh_MEfjD2MACLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-kgTFZAncEOw/X74djQyU7LI/AAAAAAABlqE/ktzaFyhuIZgwNkSQ7u_8tKWh_MEfjD2MACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_162.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_162.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content