Breaking News

मुंबई महापालिका निवडणूकित मनसेबाबत पक्ष विचार करेल : प्रवीण दरेकर

 

मुंबई : गेल्या ५० वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिकेच्या २०२२ ला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. तसेच यासाठी बुधवारी मुंबई भाजप कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप मनसेसोबत जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत भाजपचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना बोलते केले असता, मुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. बाकी निवडणूक जाहीर झाल्यावर बघू. मनसेबाबत पक्ष विचार करेल, असं म्हणाले.

राज ठाकरेंच्या वीज बिल माफीच्या आंदोलनात भाजपनेही सहभाग नोंदवला. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीतही मनसे-भाजप एकत्रित दिसणार अशी चर्चा रंगली आहे.