कोपरगाव/शहर प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील विस्थापित टपरी धारकांना खोका शॉप बांधून द्यावे अन्यथा कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती बरोबर शिवसेना दे...
कोपरगाव/शहर प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील विस्थापित टपरी धारकांना खोका शॉप बांधून द्यावे अन्यथा कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती बरोबर शिवसेना देखील उपोषणाला करेल, असा इशारा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने बुधवारी देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि सन 2010-11 साली कोपरगाव शहरातील अनेक छोटे मोठे टपरी धारकांचे अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेला मागणी करत आहोत की, विस्थापितांना लवकरात लवकर खोका शॉप बांधून द्यावी परंतु या प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे तरी हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अन्यथा कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती बरोबर शिवसेना देखील उपोषणाला बसण्याच्या भूमिकेत राहील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शहर प्रमुख कलविंदर दडीयाल, एसटी कामगार सेनेचे भरत मोरे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई माजी शहर प्रमुख असलं शेख वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, युवानेते विक्रांत झावरे, विशाल झावरे, उपशहरप्रमुख विकास शर्मा, प्रफुल्ल शिंगाडे, भूषण पाटणकर, गगन हाडा, आकाश कानडे, संघटक बाळासाहेब साळुंके, ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे नितीन राऊत, सह संघटक वैभव गिते, विभागप्रमुख रफिक शेख, व्यापारी संघटनेचे योगेश मोरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.