अन् उदयनराजे वाई न्यायालयात हजर झाले. कार्यकर्त्यांनी केली गर्दी वाई : खासदार उदयनराजे भोसले वाई न्यायालयात आज सुनावणीसाठी हजर झाले होते....
अन् उदयनराजे वाई न्यायालयात हजर झाले. कार्यकर्त्यांनी केली गर्दी
वाई : खासदार उदयनराजे भोसले वाई न्यायालयात आज सुनावणीसाठी हजर झाले होते. आनेवाडी टोल नाका हस्तांतरण व ताबा प्रकरणात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात झालेल्या धुमश्चक्री प्रकरणी सुनावणीसाठी ते हजर झाले होते.
आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकाकडे होते. हे व्यवस्थापन आपल्याकडे घेण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशील होते. टोलनाक्याच्या व्यवस्थापन हस्तांतरावरुन उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये वाद होता. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आनेवाडी टोल नाक्याचा ताबा घेण्यावरून खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात व त्यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार धुमश्चक्री झाली होती.