Breaking News

पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथून गाडीची काच फोडून दोन लाखांची चोरी.

पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथून गाडीची काच फोडून दोन लाखांची चोरी.
-------------
 दारू साठी पैसे दिले नाही म्हणून काच फोडून दोन लाखाची चोरी.


पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे एक जणांनी दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून चार चाकी गाडीची काच फोडून त्यातील दोन लाख रुपये चोरून नेले याबाबतची फिर्याद कार मालक सतिष अशोक कारखेले वय ३२ राहणार राळेगण थेरपाळ यांनी दिली आहे यावरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.१ रोजी सतिष अशोक कारखेले यांच्या मालकीची कार नंबर एम एच १६ बी एच ९७६१ ही राळेगण थेरपाळ गावात एसटी स्टँड जवळ रस्त्याचे कडेला उभी केलेली असताना आरोपी प्रशांत उर्फ अण्णा किसन कारखिले राहणार राळेगण थेरपाळ तालुका पारनेर यास  दि.३१ रोजी दारू पिण्यास पैसे दिले नाही याचा राग मनात धरुन सतिष अशोक कारखेले यांच्या कारचे दरवाजे चे नुकसान करून मागील काच फोडून शिवीगाळ करून काय करायचे ते करून घे तुमच्या घरातील एखाद्याला तरी घालवितोच तसा दम देऊन गाडी मध्ये गिअर बॉक्स जवळ ठेवलेले दोन लाख रुपये रोख व गाडीचे कागदपत्र चोरून नेले आहे त्यानुसार आरोपी विरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे करत आहेत.