Breaking News

कोरोनाने चिंता वाढवली!

 अनेक जिल्ह्यातील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह!

- हरियाणात शाळा बंद

- गुजरातमध्ये नाईट कर्फ्यू

- मध्य प्रदेशही अ‍ॅलर्टवर


नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे देशात पुन्हा प्रतिबंध लावण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी हरियाणा आणि राजस्थानमध्ये जास्त रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. मध्य आणि उत्तरेत भारतातही रुग्ण वाढले आहेत. हरियाणामध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत शाळा बंद करण्यात आल्या आहेत. 

मध्यप्रदेशमधील पाच जिल्ह्यात नाईट लॉकडाऊन राहणार आहेत. गुजरातमधील नाईट कर्फ्यू अहमदाबाद, सुरत, वडोदरा, आणि राजकोट मध्ये केला आहे. राजस्थानच्या 33 जिल्ह्यात कलम 144 लागू केला आहे. महाराष्ट्र सरकारनेही दिल्लीतून येणार्‍या विमान आणि रेल्वेमध्ये काही नियम लावण्याचा विचार करत आहे. उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी कोविडच्या दुसर्‍या लाटेचा इशारा दिला आहे. शुक्रवारी 48 दिवसांनंतर पाहिल्यांदा देसात कोरोनचे रुग्ण वाढले आहेत. देशातील सणानंतर कोरोना संक्रमणामध्ये वाढ होत असल्याचे हे संकेत आहेत. तज्ज्ञांच्या मते उत्तर भारतात थंडी सुरू झाल्याने रुग्ण आणखी वाढू शकतात. दिल्ली, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे.

 सोमवारपासून शाळा सुरु करण्याबाबत प्रश्‍नचिन्ह

औरंगाबाद : येत्या 23 नोव्हेंबरपासून मुंबई आणि ठाणे वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शाळा सुरु होणार आहेत. सरकार आणि प्रशासनाच्या या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण शाळा सुरु करण्यापूर्वी केलेल्या चाचण्यांमध्ये अनेक जिल्ह्यातील शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. आता शिक्षकांनाच कोरोनाची लागण झाल्यानंतर शाळा सुरु करण्याच निर्णय कितपत योग्य असेल, असा सवाल पालक आणि विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.