प्रतिनिधी ।बोरगाव सुरगाणा तालुक्यातील गुजरात सिमेलगत ठाणापाडा येथे कोविड -19 ची दुसरी लाट रोखण्यासाठी चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहे. गुजर...
प्रतिनिधी ।बोरगाव
सुरगाणा तालुक्यातील गुजरात सिमेलगत ठाणापाडा येथे कोविड -19 ची दुसरी लाट रोखण्यासाठी चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहे.
गुजरात सिमेलगत कोविड -19 चा संसर्गजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे नाशिक जिल्ह्याचे बॉर्डरवर आंतरराज्य चेकपोस्ट सुरू करण्यात आले असुन सुरगाणा हद्दीतील ठाणापाडा, उंबरठाण येथे चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात बाहेरून येणाऱ्या प्रवाशां सोबत त्यांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह असेल तरच प्रवेश परवानगी देण्यात येणार आहे.
यावेळी सुरगाणा येथील पोलीस निरीक्षक दिंवानसिग वसावे,सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांच्या मार्गदर्शना खाली ए.पी.आय.पवार, पोलीस हवालदार वाघ,पवार, पोलीस ना. पराग गोतरणे,संतोष गवळी,पि.एन.साळे ,होमगार्ड गावित व आरोग्य सेवक रवि शिन्दे आदी उपस्थित होते.