शिर्डी/प्रतिनिधी ः राज्यात सोमवारपासून मंदिरे सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यामुळे मंदिरे उघडले आहेत. मात्र भाविकांची मोठया प्रमाणा...
शिर्डी/प्रतिनिधी ः राज्यात सोमवारपासून मंदिरे सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यामुळे मंदिरे उघडले आहेत. मात्र भाविकांची मोठया प्रमाणावर गर्दी होत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग देखील वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. शिर्डीतील साई मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. भाविकांनी येतांना ऑनलाईन पास घेऊनच येण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच पालखी घेऊन येणार्या पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी घेऊन येण्याचे टाळावे असे आवाहन साई संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
जगभरात, देश व राज्यात आलेल्या कोरोना साथीच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने जवळपास सात महिने टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. 17 मार्चपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. राज्य शासनाच्या आदेशान्वये 16 नोव्हेंबरपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. अजून कोरोनाचे सावट संपले नसून सर्व साईभक्तांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गुरुवार शनिवार, रविवार व सलग सुट्टयांच्या कालावधीत गर्दी होवु नये म्हणून साईभक्तांनी शिर्डी येथे श्रींचे दर्शनाकरिता येतानी संस्थानच्या
ेपश्रळपश.ीरळ.ेीस.ळप या संकेतस्थळावरुन ऑनलाईन दर्शन पास घेवुनच यावे. ऑनलाईन पास निश्चित झाल्यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे. तसेच दर गुरुवारी शिर्डी व पंचक्रोशितील नियमित येणार्या भाविकांनी श्रीं चे दर्शनासाठी मोफत बायोमॅट्रीक पास घेवुन मंदिरात प्रवेश करावा. मुखपट्यांचा वापर न करण्यार्या साईभक्तांना, 10 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया व 65 वर्षावरील व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. या शिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पूजेचे साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे. तरी कोरोना विषाणुच्या संकटामुळे श्रीं च्या दर्शनाकरीता ठरावीक संख्येनेच मंदिरात प्रवेश दिला जात असल्यामुळे ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे अन्यथा गैरसोय होऊ शकते. याबरोबरच जे साईभक्त आजारी आहेत अशा साईभक्तांनी दर्शनाकरीता येऊ नये.तसेच पालखी मंडळाचे पदाधिका-यांनी पदयात्रींसह पालखी घेऊन शिर्डी येथे येण्याचे टाळावे असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने करण्यात आले आहे.