मुंबई : ठाकरे सरकार घोटाळेबाज आमदार प्रताप सरनाईकांचं संरक्षण करतंय, असा गंभीर आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. प्रता...
मुंबई :
ठाकरे सरकार घोटाळेबाज आमदार प्रताप सरनाईकांचं संरक्षण करतंय, असा गंभीर आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. प्रताप सरनाईक यांनी कोट्यवधी रुपयांचा लाच घेतल्याचा सणसणीत आरोप सोमय्या यांनी केला.
टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच दिल्याची माहिती समोर येत आहे. ईडीच्या चौकशीतून काही धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. याप्रकरणी 28 ऑक्टोबर 2020 रोजी खासगी एफआयआर नोंदविला गेला. परंतु एमएमआरडीए, मुंबई पोलिस, ठाकरे सरकार यांनी अद्याप ही चौकशी सुरु केली नाही, असं सोमय्या म्हणाले.