Breaking News

रत्नागिरी- रॉट व्हिलर कुत्र्याच्या हल्ल्यात कामगार ठार रत्नागिरी : 

रॉट व्हिलर या कुत्र्याने एका कामगारावरच हल्ला करत ठार केल्याची घटना रत्नागिरीत घडली. हा कामगार कुत्र्यांना खायला प्यायला घालत होता. मात्र पिसाळलेल्या कुत्र्याने त्याचा बळी घेतला.

रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर यांनी विविध जातीचे 10-12 कुत्रे पाळले आहेत. या सर्व कुत्र्यांना खाणं पिणं घालण्याचे काम दिवाकर पाटील (55) हे करत होते.

या कुत्र्यांना खायला घालत असतानाच पिसाळलेल्या रॉट व्हिलर या कुत्र्याने दिवाकर पाटील यांच्या मानेवर झडप घातली. कुत्र्याने त्यांच्या मानेला, छातीला आणि तोंडाला चावा घेताच दिवाकर पाटील रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले. कुत्र्याची झडप इतकी भीषण होती की त्या हल्ल्यात दिवाकर पाटील यांचा मृत्यू झाला.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून बाळा मयेकर यांच्याकडे पाळीव प्राण्यांचा परवाना होता की नाही, याचा आम्ही तपास करीत आहोत अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी दिली.