Breaking News

’इस्रो’च्या ’अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट’चे प्रक्षेपण

- अंतराळातून ठेवता येणार शत्रूंवर नजर 


श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)/ प्रतिनिधी 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने शनिवारी यंदाच्या पहिल्या सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण केले. इस्रोच्या अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईटचे प्रक्षेपण दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन झाले. 

पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल-49 द्वारे इओएसओ01 या सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यात आले. यासोबतच अन्य 9 आंतरराष्ट्रीय सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यात अमेरिकेचे चार, लक्झेंबर्गचे चार आणि लिथुआनियाच्या एका सॅटेलाईटचा समावेश आहे, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यांत सॅटेलाईट पीएसएलव्हीपासून यशस्वीरित्या वेगळा झाला आणि त्यानंतर तो ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. इओएसओ01 हे पृथ्वीवर नजर ठेवणारे सॅटेलाईट आहे. पीएसएलव्हीची ही 51 वी मोहिम आहे. या नव्या सॅटेलाईटमुळे शेती, वन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर शत्रूंच्या हालचालीवर यामुळे नजर ठेवता येणार आहे.

--------------------