माजलगाव। प्रतिनिधी येथील श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलातील शिषुविहार ते वरीष्ठ महाविद्यालय अशा सर्व संस्कार केंद्राची व्यापक बैठक आज संपन्न...
माजलगाव। प्रतिनिधी
येथील श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलातील शिषुविहार ते वरीष्ठ महाविद्यालय अशा सर्व संस्कार केंद्राची व्यापक बैठक आज संपन्न झाली.
या बैठकीची सुरुवात सांघिक पद्य, संविधान, सरस्वती तसेच स्व दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. यावेळी बोलताना संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे यांनी सांगितले की, श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुल सातत्याने नित्य, नुतन व शाश्वत उपक्रम राबविणारे संकुल आहे म्हणून मला अशा उपक्रमाच्या निमित्ताने वारंवार श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलात येण्याचे योग येतात, संविधान दिन आणि बलिदान दिन अशा दोन्ही अर्थाने आजच्या दिवसाचे महत्व आहे, तसेच स्व दत्तोपंत ठेंगडी यांच्या जीवन कार्याचा परिचय यावेळी त्यांनी करुन दिला. यावेळी स्व दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जन्म शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा संस्थेचे उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया यांच्या हस्ते स्व दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमा संकुलातील सर्व संस्कार केंद्र प्रमुखांना देण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे सहकार्यवाह प्रा चंद्रकांत मुळे यांनी उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्राध्यापक,शिक्षकांनी आदर्श मुल्य जोपासून ते पुढील पिढीत संक्रमित केले पाहिजे तसेच आपल्या कामात आपण कर्तव्य कठोर राहिले पाहिजे. या बैठकीसाठी संस्थेचे उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया, कार्यवाह नितीन शेटे,सहकार्यवाह प्रा चंद्रकांत मुळे,श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड,कार्यवाह अमरनाथ खुर्पे इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच महाविद्यालय समितीचे अध्यक्ष अभय कोकड,माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष प्रेमकिशोर मानधने,अॅड विश्वास जोशी,तेजस महाजन,जगदिश साखरे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी,प्राचार्य डॉ भालचंद्र कराड,मुख्याध्यापक अंबादास रोकडे,श्रीमती स्वाती बलखंडे सर्व प्राध्यापक,शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या बैठकीचा अध्यक्षीय समारोप राधेश्याम लोहिया, प्रास्ताविक श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह अमरनाथ खुर्पे यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रा डॉ रमेश गटकळ यांनी केले, बैठकीची सांगता पसायदानाने झाली.