Breaking News

रोजगार हमी योजनेअंतर्गत जामगाव मध्ये फुलवली शेतकऱ्यांनी तुतीची बाग.

रोजगार हमी योजनेअंतर्गत जामगाव मध्ये फुलवली शेतकऱ्यांनी तुतीची बाग.
------------------
एकीकडे संततधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले तर दुसरीकडे जामगाव मधील शेतकऱ्यांनी केला रेशीम उद्योग.
---------------
शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पीकही घेतले व त्यापासून रोजगारही मिळवला.
---------------
योजनेत सहभाग घ्यावा त्यातून आपले गाव व आपला तालुका समृद्ध होईल तहसीलदार.


पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यांमध्ये जामगाव येथे सात शेतकऱ्यांनी एकत्र येत सात एकर तुतीची लागवड केली  ही लागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आली याची पाहणी करण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे यांनी या शेतीला भेट दिली यावेळी शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पिकाची जोपासना करून तुतीची बाग फुलवली होती एकीकडे संततधार पावसामुळे व रोगराईमुळे शेतमालाचे नुकसान झाले होते मात्र दुसरीकडे या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तुतीची शेती बहरलेली पाहायला मिळाल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी समाधान व्यक्त केले.


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जामगाव येथील ठकचंद छबु मांढरे,बाबासाहेब छबु मंचरे,सोन्याबापु बबन शिंदे,सुधीर शिवाजी चत्तर, द्वारकाबाई बबन घावटे,या शेतकऱ्यांनी दोन महिन्यापूर्वी आपल्या शेतामध्ये तुतीची लागवड केली योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना आपल्याच शेतामध्ये रोजगारही उपलब्ध झाला त्यामुळे स्वतःच्या शेतामध्ये पीक तर घेतले मात्र त्याच व सोबत रोजगारही मिळवला त्यामुळे शेतकऱ्याची मेहनतही वाया गेली नाही यातून पुढे एका शेडमध्ये रेशीम किडे ठेवले जाणार आहे त्यांना तुती चे पाने टाकली जाणार आहे त्यापासून रेशीम कोश तयार केले जाणार आहेत त्यातून रेशीम निर्मिती केली जाणार आहे त्यातून आर्थिक उत्पन्न या शेतकऱ्यांना मिळणार आहे हा वेगळा प्रयोग या शेतकऱ्यांनी केला व तो सध्या तरी यशस्वी झालेला आहे  संततधार पाऊस ढगाळ वातावरण यामुळे अनेक पिके रोगराईमुळे खराब झाले मात्र तुतीच्या या बागेमध्ये त्या पानावर कोणत्याही प्रकारचा रोग पडलेला नाही त्यामुळे या भागात तुतीला पोषक वातावरण आहे तसेच तालुक्यातील अजूनही काही शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा प्रयोग केला तर तो यशस्वी होऊ शकतो हे जामगाव येथील उदाहरणावरून दिसत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या व सामूहिक लाभाच्या योजनेमध्ये सहभाग घेऊन अशा प्रकारची फायद्यात येणारी शेती केली जाऊ शकते तुती साठी या शेतकऱ्यांना एक एकर ला ३ लाख २३ हजार ७९० रुपये अनुदान मिळते हे अनुदान तीन वर्षासाठी आहे व रेशीम विकास महामंडळाचे वेळोवेळी जागेवर येऊन मार्गदर्शन मिळते त्यामुळे तालुक्यात तुती व त्यातून रेशीम उद्योग साठी हवामान अनुकूल आहे तालुक्यात जर रेशीम विकासाचे क्षेत्र वाढले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.यासाठी रेशीम विकास महामंडळ व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने कार्यक्रम अधिकारी तहसीलदार ज्योती देवरे यांचे वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत आहे
तुतीची लागवड विविध हवामानाच्या आणि भू-स्थितीच्या विस्तृत क्षेत्रामध्ये केली जाउ शकते. रेशमाच्या कोशांच्या सफल उत्पन्नासाठी आवश्यक असलेले उच्च गुणवत्तायुक्त पानांचे पीक उत्तम पध्दतींचा वापर करून मिळविणे शक्य आहे.

तालुक्यात एकीकडे पावसाने शेतमालाचे नुकसान झाले म्हणून शेतकऱ्यांचे दुखी चेहरे पाहिले तर दुसरीकडे एमआरजीएस सारख्या योजनेच्या माध्यमातून तुतीची बाग फुलवणाऱ्या जामगाव मधिल उपसरपंच असलेल्या महिला शेतकऱ्याच्या चेहर्‍यावरील आनंद खूप काही सांगून गेला तालुक्यातील इतरही शेतकऱ्यांनी ग्रामसमृद्ध योजनेत सहभाग घ्यावा त्यातून आपले गाव व आपला तालुका समृद्ध होईल.
-------------
ज्योती देवरे 
तहसीलदार पारनेर
 
 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे शेतकऱ्याला मिळाला दिलासा स्वतःच्या शेतात एकत्र येत विचार विनिमय करून उत्तम नियोजन करून व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून चांगल्या पद्धतीने शासनाच्या योजनेचा फायदा घेऊन शेती फायद्यात येऊ शकते हेच या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे रोगराई मुक्त तुतीची बाग फुलवल्याचा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.