नाशिकरोड, प्रतिनिधी कामगार कायद्यांचे कामगारांना असलेले संरक्षण सरकार काढून घेत असून संप, आंदोलन करुन मिळविलेले अधिकार, हक्क सरकार हिरावून...
नाशिकरोड, प्रतिनिधी
कामगार कायद्यांचे कामगारांना असलेले संरक्षण सरकार काढून घेत असून संप, आंदोलन
करुन मिळविलेले अधिकार, हक्क सरकार हिरावून घेत आहे. सरकारने कामगार
कायद्यामध्ये बदलाचे घेतलेले निर्णय मागे घ्यावेत, अशी मागणी इंडिया सिक्युरीटी प्रेस मजदुर संघाचे सरचिटणीस जगदिश गोडसे यांनी केली.
सरकारच्या कामगार, शेतकरी धोरण्याविरोधात प्रेससमोर निर्देशने झाली. त्यावेळी ते बोलत होते. कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेशटाकेकर, सयुंक्त सचिव कार्तिक डांगे, नंदु पाळदे,दिनकर खर्जुल,
उत्तम रकिबे, शिवाजी कदम, इरफान शेख, रमेश खुळे, गौतम थोरात, जयराम
कोठूळे, चंद्रकांत हिंगमिरे, नंदु कदम, भीमा नवाळे, आण्णा सोनवणे,
विनोद लोखंडे, अविनाश देवरुखकर, संदिप व्यवहारे, रौफ शेख, भगवान मोरे, भिमराव साळवे, राजु जगताप, आप्पा ताजनपुरे, संतोष
ताजनपुरे, मनोज सोनवणे, संपत घुगे, अशोक जाधव, कैलास मुठाळ, महेश साखर,
राजु नागरे, अनिल कैचे आदी उपस्थित होते.