Breaking News

महागठबंधनला मागे टाकत एनडीएची आघाडी

- तेजस्वी यादव आघाडीवर

-  घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी


पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. कलांमध्ये सुरुवातीला मुसंडी मारणाऱ्या महागठबंधनची सध्या घसरगुंडी पाहायला मिळत आहे. तर एनडीएने जबरदस्त कमबॅक केलं आहे. आरजेडीचे  अध्यक्ष तेजस्वी यादव  यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा गराडा घातला आहे. बिहार विधानसभा  निवडणुकीच्या मतमोजणीत  राजद-काँग्रेसचे महागठबंधन पुढे असल्याचे दिसताच कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांच्या घरासमोर गराडा घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी तेजस्वी यादव यांचा फोटो घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याचे चित्र आहे. तेजस्वी यादव  हे त्यांच्या राघोपूर मतदारसंघात आघाडीवर आहेत. राज्यात सर्वत्र काँटे की टक्कर सुरू असून मतमोजणीत प्रचंड चुरस दिसून येत आहे. त्यामुळे आताच निकालाचं भाकित करणं घाईचं ठरू शकते. ३१ वर्षांच्या तरुणाने देशातील भल्याभल्यांना आव्हान दिले. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु व्हायला हरकत नाही. निकाल हाती आल्यानंतर जंगलराज संपून मंगलराज सुरु होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या कलांबाबत दिली.

---

* कलांनुसार महागठबंधनला मागे टाकत एनडीची 126 जागांवर आघाडी. महागठबंधन 102 जागांवर पुढे. दुसरीकडे 28 जागांवर एक हजारपेक्षा कमी मतांचं अंतर तर 70 जागांवर अटीतटीची लढाई

* महागठबंधनची घसरगुंडी, एनडीए 131 तर महागठबंधन 99 जागांवर पुढे, बिहारमध्ये भाजपचं सेलिब्रेशन

* एनडीए आणि महागठबंधनच्या आकडेवारीमधील दरी वाढली, आताच्या कलांमध्ये एनडीएची मुसंडी, एनडीए 121 तर 108 जागांवर पुढे, तर पहिल्या क्रमांकासाठी राजद आणि भाजपमध्ये रस्सीखेच, भाजपला 71 तर राजदला 71 जागांवर आघाडी