Breaking News

शिवसेना शहर प्रमुख सागर राठोड यांनी घेतली आढाव बैठक

शिवसेना शहर प्रमुख सागर राठोड यांनी घेतली आढाव बैठक


पाथर्डी/प्रतिनिधी :
जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्या आदेशानुसार पाथर्डी शहरात शिवसेनेची आढावा बैठक, शिवसेना शहर प्रमुख सागर राठोड यांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी व पक्षवाढी संदर्भात चर्चा झाली.
           सदस्य नोंदणी अभियान प्रत्येक वाड॓मध्ये निश्चित करण्यात आले.मोठ्या प्रमाणात  पाथर्डी शहरातील शिवसैनिक उपस्थित होते.बैठकीमध्ये मोलाचे मार्गदर्शन माजी तालुका प्रमुख श्री अनिल फुंदे व तालुका उपप्रमुख नवनाथ वाघ यांनी केले. यावेळी उप शहरप्रमुख प्रीतम व्यवहारे,विकास दिनकर, सागर दिवकर,निलेश चव्हाण,उदय राजगुरू,घनश्याम घोडके,सर्व शाखा प्रमुख उपस्थिती होते.