कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालला आहे. हा धोका आणखीन वाढून कोरोनाची दुसरी लाट येऊ यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जाहीर क...
कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालला आहे. हा धोका आणखीन वाढून कोरोनाची दुसरी लाट येऊ यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. या गाईडलाइन्स 1ते 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहेत.
गृहमंत्रालयाने कोरोना संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचना व नियमांना राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना सक्तीने अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आलं आहे. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी परवानगी देण्यात आलीय. कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची सक्ती केली जावी. याशिवाय ज्या शहरांमध्ये आठवड्यातील पॉझिटिव्ह रेट १० टक्क्यांच्या वर आहे तिथे कार्यालयीन वेळांबद्दल योजना तसंच इतर उपाययोजनांबद्दल विचार करावा जेणेकरुन सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल असंही गृहमंत्रालयाने सांगितलं आहे.