Breaking News

मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल

 

मुंबई : आजच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनातून मुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशातच, आता महाविकास आघाडीमधील आणखी एक महत्वाचे मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना अचानक प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धनंजय मुंडे यांच्याकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासोबतच सामाजिक न्याय मंत्रीपद देखील आहे. त्यांना तीव्र पोटदुखीमुळे काही वेळापूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सद्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे. मात्र, गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना आजाराने ग्रासल्याचं दिसून आलं आहे. तर, खुद्द धनंजय मुंडे यांना देखील काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लग्न झाली होती. मात्र यातून ते बरे झाले असता आता त्यांना पोटदुखीने ग्रासले आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देखील याबाबत ट्विट करण्यात आलं आहे. “तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल.” असं ट्विट करण्यात आलं आहे.