Breaking News

खडसेंपाठोपाठ भाजपचा दिग्गज नेता कोरोनाच्या विळख्यात!

 मुंबई : गेले आठ महिने कोरोनाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. मागील काही दिवसांत सरासरीनुसार कमी रुग्ण आढळून येत होते. तर, कोरोनामुक्तांचा देखील एकदा अधिक आहे. मात्र, पुढील काही महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. अशातच पुन्हा एकदा राजकीय नेत्यांसह इतर नागरिकांना देखील कोरोनाचा धोका वाढत असल्याचं दिसून येत आहे.

आज, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना देखील कोरोनाची झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. 'माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहे.मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे,स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.' असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी भाजपला दणका देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना देखील कोरोनाने विळखा घातला आहे. पुढील उपचारासाठी ते मुंबईला येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. 'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची कोव्हीड चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल.' असं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे.