Breaking News

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत


अहमदनगर/प्रतिनिधी :
माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नगर शहरातील उच्चभ्रू व राजकीय नेत्यांची वसाहत असलेल्या यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरु आहे.

गौरी प्रशांत गडाख (वय ३२) यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात साईदीप रुग्णालयाने तोफखाना पोलीस ठाण्यास माहिती कळवली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे. आज, शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली.

गौरी प्रशांत गडाख यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गौरी प्रशांत गडाख मृतावस्थेत आढळल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. रात्री उशिरापर्यंत विच्छेदन प्रक्रिया सुरू होती.