Breaking News

एसटी कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त दहा हजार रुपये अग्रीम

 - पगार नसला तरी कर्मचार्‍यांची दिवाळी गोड


मुंबई/ प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ - एसटी कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त दहा हजार रुपये अग्रीम देण्यात येणार आहे. अग्रीमसाठी कर्मचार्‍यांनी विहित नमुन्यात अर्ज करण्यास सुरुवात केली असून, ज्या कर्मचार्‍यांनी अद्याप अर्ज केले नाही, त्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन महामंडळानं जारी केलेल्या पत्रकात केले आहे.