Breaking News

प्रसिद्ध ज्योतिषी श्रीमंत उमाकांत पुरकर कालवश

- चक्रीय अष्टकवर्ग शाखेचे देशातील एकमेव तज्ज्ञ

अहमदनगर/ प्रतिनिधी 

ज्योतिषशास्त्रातील चक्रीय अष्टकवर्ग या गहन ज्योतिषपद्धतीचे अभ्यासक व राज्यातील प्रसिद्ध ज्योतिषी श्रीमंत उमाकांत वामनराव पुरकर यांचे रविवारी वयोमानाने निधन झाले. नगर येथील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य संतोष घोलप यांचे ते गुरु होते. चक्रीय अष्टकवर्ग या ज्योतिषशाखेचे घोलप हे आता एकमेक ज्योतिर्विद राज्यात उरले आहेत. 

स्व. श्रीमंत उमाकांत पुरकर यांचे मृत्यूसमयी वय 70 वर्षे इतके होते. त्यांच्या पश्‍च्यात पत्नी, तीन भाऊ, दोन मुले, सुना व नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. रविवारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुरकर हे चक्रीय अष्टकवर्ग या ज्योतिष शाखेतील गहन शाखेचे विद्वान होते. ही शाखा सर्वात प्राचीन व अचूक मानली जाते. ज्योतिषविद्येतील अंधश्रद्धा दूर करून त्यांनी हे शास्त्र अधिक सुसंवादीत केले होते. 20 व्या शतकातील ते देशातील सर्वात अभ्यासू ज्योतिर्विद होते. देशविदेशातील जाणकार त्यांच्याकडे येत असतं. नगर येथील प्रसिद्ध ज्योतिर्विद संतोष घोलप यांचे ते गुरु होते. चक्रीय अष्टकवर्ग या ज्योतिष शाखेचे घोलप हे एकमेव जाणकार आता राज्यात उरले आहेत.

ज्योतिषशास्त्रातील सूर्य मावळला : संतोष घोलप

प्राचीन ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक, विद्वान आणि चक्रीय अष्टकवर्ग या सर्वात कठीन व गहन शाखेचे अभ्यासक उमाकांत पुरकर यांच्या निधनाने ज्योतिषशास्त्रातील सूर्य मावळला आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध ज्योतिर्विद संतोष घोलप यांनी दिली आहे. गुरुंच्या नावाने आपण पुणे, मुंबईसह नगर येथे स्वतंत्र अध्यासन चालविणार असल्याचेही ते म्हणाले.

-----------------------