पंतप्रधानांच्या बैठकीत पुन्हा लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दोन बैठका घेणार आहेत. त्यातील पहिली बैठक ही आठ...
पंतप्रधानांच्या बैठकीत पुन्हा लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दोन बैठका घेणार आहेत. त्यातील पहिली बैठक ही आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणार आहे. ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे, अशा ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या बैठकीत इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसोबत बैठक असणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आणि कोरोना लसीच्या वितरणाबाबतचं नियोजन यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, संबंधित अधिकारी आणि प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी संवाद साधणार आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दोन बैठका घेणार आहेत. त्यातील पहिली बैठक ही आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणार आहे. ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे, अशा ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या बैठकीत इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसोबत बैठक असणार आहे. या बैठकीत कोरोनाच्या लसीचं वाटप करण्यासंबंधीचं धोरणदेखील निश्चित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रासह दिल्लीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसते आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या दरदिवशी ५० हजारांच्या खाली आली असताना काही राज्यातील रुग्णसंख्येत मात्र वाढ नोंदवली जाऊ लागली आहे. यासाठी काही ठिकाणी लॉकडाऊन तर काही ठिकाणी संचारबंदीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.