अमरावती : अमरावती शहरातील तपोवन परिसर आणि गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे तबल ३० पेक्षा जास्त चार चाकी वाहनांची अज्ञातांकडून तोड...
अमरावती : अमरावती शहरातील तपोवन परिसर आणि गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे तबल ३० पेक्षा जास्त चार चाकी वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे अमरावती शहरात पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न वाहन शहर वासीयांनी उपस्थित केला आहे.
मागील काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारे नाशिक शहरात मध्यरात्री काही अज्ञातांनी धुडगूस घालून लाखो रुपयांच्या गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता अमरावतीतही पहाटे मध्यरात्री अज्ञातांनी तपोवन परिसर तसेच गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक दोन नव्हे तर तब्बल ३० पेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.