Breaking News

'मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ : मुंढे

 औरंगाबाद : आज पदवीधर मतदारसंघांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांचे नाव घोषित केले असतानाच नाराज इच्छुकांनी देखील बंडखोरीचा झेंडा उभारत उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे.

औरंगाबादमधून भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे आणि बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसू शकतो असं म्हणलं जात आहे. तर, दुसऱ्याबाजूला पकंजा मुंडे यांची राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्यानंतरही त्या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय क्षेत्रात केल्या जाऊ लागल्या आहेत.

विधानपरिषदेवरील औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांनी अर्ज भरला. यावेळी पंकजा मुंडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. "मी नाराज नाही, सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत. पण सगळे माझ्या जवळचे कार्यकर्ते आहेत. सगळीकडे निवडणूक होत आहे. मी सगळं बळ लावण्यासाठी इथे आले आहे" अशी प्रतिक्रिया त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.