Breaking News

अमिताभ बच्चन, सोनी टीव्ही विरोधात गुन्हा

- कौन बनेगा करोडपती वादात 

- मनुस्मृतीवर प्रश्‍न विचारल्याने उच्चवर्णियांचे पोट दुखले


मुंबई/ प्रतिनिधी 

कौन बनेगा करोडपती हा लोकप्रिय शो वादात सापडला आहे. शोच्या एका एपिसोडमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावरून वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायींनी कोणत्या धर्मग्रंथांच्या प्रति जाळल्या होत्या?’ असा प्रश्‍न स्पर्धकाला विचारण्यात आला होता. या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी चार पर्याय देण्यात आले होते. यावरून पोट दुखलेल्या अनेक उच्चवर्णियांनी सोनी टिव्ही वाहिनी व अमिताभ यांच्यावर टीका केली. या मुद्द्यावरून या उच्चवर्णियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे शो चे सूत्रसंचालक, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि केबीसी कार्यक्रमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

------------------