आठ दिवसांत सुमारे 48 हजार भाविकांनी घेतले दर्शन शिर्डी/प्रतिनिधी : राज्य शासनाच्या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठ...
आठ दिवसांत सुमारे 48 हजार भाविकांनी घेतले दर्शन
शिर्डी/प्रतिनिधी : राज्य शासनाच्या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेले असून 16 नोव्हेंबर ते दिनांक 24 नोव्हेंबर या कालावधीत सुमारे 48 हजार 224 साईभक्तांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला. तर याकाळात साईभक्तांकडून विविध प्रकारे 03 कोटी 09 लाख 83 हजार 148 रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली.
सध्या कोरोना विषाणु (कोवीड 19) ची साथ चालु असून कोरोना विषाणुच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने 17 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला होता. तेव्हापासून साईमंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर राज्यात मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आली. यामध्ये टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा सामावेश असून ऑनलाईन व सशुल्क दर्शन,आरती पासेसव्दारे 61 लाख 04 हजार 600 रुपये प्राप्त झालेले आहे. तसेच या कालावधीमध्ये श्री साईप्रसादालयामध्ये सुमारे 80 हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला आहे.
साई भक्तांसाठी शिर्डीत हेल्पलाईन उपलब्ध
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर साईभक्तांना शिर्डीची वारी व श्रीं चे दर्शन सुलभरित्या व्हावे या उद्देशाने संस्थानच्या वतीने साईभक्तांच्या सेवेकरीता हेल्पलाईन कक्ष, कंट्रोल रुम व व्हाट्सअप ही सुविधा कायमस्वरुपी 24 तास सुरु करण्यात आलेली आहे. हे कक्ष साईभक्तांकरीता कायमस्वरुपी 24 तास उपलब्ध असणार आहे. याकरीता श्री साईबाबा संस्थानचे हेल्पलाईन मोबाईल नंबर +917588374469,+917588373189 , +917588375204, कंट्रोल रुम मोबाईल नंबर +917588371245 , +917588372254 व व्हाट्सएप नंबर +919403825314 हे क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तरी साईभक्तांनी अधिक माहिती करीता या मोबाईल क्रमांकांवर संपर्क करावा असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने करण्यात येत आहे.