$type=ticker$snippet=hide$cate=0

आदिवासी मजूर अजूनही वेठबिगारीच्या विळख्यात

आदिवासी मजुराचे बेदम मारहाणः, हातपाय बांधून केले अपहरण शेनित,/प्रतिनिधी : राज्यात मोठ्या प्रमाणात विटभट्टी मालक, दगड खाणी मालक, द्राक्ष बागा...





आदिवासी मजुराचे बेदम मारहाणः, हातपाय बांधून केले अपहरण

शेनित,/प्रतिनिधी :

राज्यात मोठ्या प्रमाणात विटभट्टी मालक, दगड खाणी मालक, द्राक्ष बागायतदार, ऊस उत्पादक व तत्सम मालकवर्गाकडून वेठबिगारी विरोधी कायद्याची [The Bonded Labour System (Abolition) Act,1976] सर्रास पायमल्ली होत आहे. त्यामुळे आदिवासी मजूर  अजूनही वेठबिगारीच्या विळख्यात अडकले आहेत. नाशिक मधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या डहाळेवाडी येथे प्रकाश गोडे या मजुराला वीट भट्टी मालकाने बेदम मारहाण करून, त्याचे हातपाय बांधून त्याला चारचाकी गाडीतुन पळवुन नेल्याप्रकरणी  घोटी पोलीस ठाण्यात अपहरण व वेठबिगारीचा गुन्हा दाखल झाला आहे.  याप्रकरणी आरोपी विटभट्टी मालकाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयापुढे हजर केले असता त्याला १ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रवानगी करून आज त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

फिर्यादी सुनीता प्रकाश गोडे या पीडित मजुराच्या पत्नीने मालक अमोल भोसले व दोन अज्ञातांविरोधात तिच्या पतीचे अपहरण केल्याची घोटी पोलीस ठाण्यात फीर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, "विटभट्टीवर काम करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर तालुक्यातील शिरगाव येथील वीटभट्टी मालक अमोल भोसले यांच्याकडुन मी विटभट्टीवर विटा वाहण्यासाठी १२ हजार व माझा पती प्रकाश गोडे विटा थापण्यासाठी यांनी २० हजार रुपये उचल (बयाना) घेतली होती. सदरची रक्कम विटभट्टीवर काम करून फेडण्याचे ठरले होते. त्यासाठी दिवाळी सणानंतर कामावर जायचे ठरले होते. परंतु दिवाळीनंतर अमोल भोसले यांचे विटभट्टीवर जाण्यासाठी चार दिवस उशीर झाला.  दि. २१ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमोल भोसले व त्यांच्या दोन साथीदारांनी डहाळेवाडी येथील फीर्यादीच्या घरात घुसुन प्रकाश गोडे यांना मारहाण करीत हात-पाय बांधून त्यांना चारचाकी वाहनातुन जबरदस्तीने घेऊन गेले" असे तक्रारीत नमुद केले आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अमोल भोसले व त्याच्या दोन साथीदार विरोधात भादवि कलम ३६३, ४५२, ३७४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन विटभट्टी मालक वेठबिगारी करण्यास भाग पाडत असल्याचा प्रकार श्रमजिवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रमजीवी संघटनेने वर्षभरात  पालघर, ठाणे, नाशिक आणि  रायगड जिल्ह्यातील २६ वेठबिगारांना मुक्त केले आहे.

दरम्यान, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष श्री विवेक पंडित यांनी "समाजातील ही अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी वेठबिगारी विरोधी कायद्याची [The Bonded Labour System (Abolition) Act,1976] ची कठोर अंमलबजावणी करावी. त्यासाठी राज्याचे कामगार आयुक्त यांच्याकडून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत. तसेच, मुक्त करण्यात आलेल्या वेठबिगारांना 'तात्काळ सहाय्य' आणि 'दीर्घकालीन पुनर्वसन' करण्यासाठी राज्य सरकारच्या मदत आणि विशेष साहाय्य विभागामार्फत जिल्हाधिकारी यांना मदतीचा निधी आणि आदेश द्यावेत" अशी मागणी केली आहे.

सदर घटनेचा अधिक तपास घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कवडे करत आहे. दरम्यान आरोपी अमोल भोसले याला अटक करण्यात आली असून, काल दिनांक २२ रोजी न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती व आज पुन्हा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपीची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5558,letest News,587,Loksabha-2019,164,Maharashtra,104,Mumbai,41,New Window,210,News,316,satara,8,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,139,अहमदनगर,10005,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,664,देश,4172,नाशिक,778,पुणे,608,बीड,1424,बुलढाणा,861,ब्रेकिंग,15444,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,156,महाराष्ट्र,12548,महाराष्ट्र सातारा,31,मुंबई,3458,विदेश,637,संपादकीय,1470,सातारा,3163,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: आदिवासी मजूर अजूनही वेठबिगारीच्या विळख्यात
आदिवासी मजूर अजूनही वेठबिगारीच्या विळख्यात
https://lh3.googleusercontent.com/-ewIEgzUGHCg/X7-dBiN4QVI/AAAAAAABlzg/jDtEcwj8AwYlWB1tUaJIbyqgmm_Dh6SnACLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-ewIEgzUGHCg/X7-dBiN4QVI/AAAAAAABlzg/jDtEcwj8AwYlWB1tUaJIbyqgmm_Dh6SnACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_376.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_376.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content