Breaking News

तालुक्यातील सगळे अवैध धंदे पूर्णतः बंद करणार - घनश्याम बळप

तालुक्यातील सगळे अवैध धंदे पूर्णतः बंद करणार - घनश्याम बळप.
--–------
महिलांविषयी येणाऱ्या तक्रारींनी दखल घेऊन त्रास देणाऱ्याची गय केली जाणार नाही.
-----------
पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारताच अवैध व्यावसायिकांना दिला इशारा!
------------
एलसीबी,अँटी करप्शन,नक्षलवादी भागातील कामाचा अनुभव पाठीशी.
------------
राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची घेतली भेट तालुक्यात चांगले काम करा लोकांच्या समस्यांना प्राधान्य देण्याचा अण्णांनी दिला सल्ला.


पारनेर प्रतिनिधी- पारनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी  घनश्याम बळप  यांची शुक्रवारी  पोलीस अधीक्षक  मनोज पाटील यांनी  नियुक्ती केली आहे  त्यामुळे पारनेर पोलीस स्टेशनला  सव्वा वर्षानंतर कायमस्वरूपी  पोलीस निरीक्षक  मिळाले आहेत  त्यांनी शनिवार दि.७ रोजी सकाळी ११ वाजता पारनेर पोलीस स्टेशन मध्ये पदभार स्वीकारला.पारनेर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच तालुक्यातील सगळे अवैध धंदे पूर्णतः बंद करणार असल्याचे सांगून अवैध व्यावसायिकांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.
घनश्याम बळप हे यापूर्वी गोंदिया सातारा सांगली पुणे नागपूर या ठिकाणी त्यांनी काम केले आहे गोंदिया सारख्या नक्षलवादी भागांमध्ये त्यांनी काम केले नुकतेच नागपूर हुन अहमदनगर जिल्ह्यात आले होते त्यानंतर त्यांची पारनेर पोलीस स्टेशन मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे ते नागपूर येथे एलसीबी मध्ये होते यापूर्वी त्यांनी पुणे जिल्ह्यात काम केलेले आहे पुण्यात त्यांच्याकडे लाचलुचपत विभागाचे निरीक्षक म्हणून पदभार होता. त्यांच्याकडे कामाचा दांडगा अनुभव आहे त्यामुळे पारनेर तालुक्यात ते या अनुभवाच्या जोरावर गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात यशस्वी राहतील 


पारनेर पोलीस स्टेशन मध्ये आता नव्याने नियुक्त झालेल्या पोलिस निरीक्षक धनशाम बळप यांना येत्या काही दिवसातच पारनेर नगरपंचायत निवडणूक तशी तालुक्यातील ८८ ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे त्याचबरोबर तालुक्यातील गुन्हेगारी अवैध व्यवसाय मटका बिंगो गुटका वाळू माफिया तालुक्यात होणारे मुलींचे अपहरण तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे आवाहन असणार आहे.पदभार स्वीकारताच आव्हानांचा सामना करण्याचा अनुभव पाठीशी आहे तालुक्यात त्यानुसार काम करणार असून गुन्हेगारांवर वचक राहील असे काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
सव्वा वर्षापूर्वी पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांचे निलंबन व त्यानंतर नियंत्रण कक्षात बदली झाली होती त्यावेळी विधानसभेची निवडणूक तोंडावर असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्याकडे पारनेर पोलीस स्टेशन चा प्रभारी पदभार देण्यात आला होता त्यांनी विधानसभा निवडणूक चांगल्या पद्धतीने हाताळली त्यानंतर कोरोना काळामध्ये त्यांच्याकडे पदभार राहिला त्यातही त्यांची कामगिरी चांगली राहिली त्यांनी जवळपास सव्वा वर्ष  ठाण्याचा पदभार पाहिला त्यांनी अनेक गुन्ह्यांचा त्वरित तपास त्यांनी लावला मात्र कायमस्वरूपी पोलिस निरीक्षकाची कमतरता पारनेर पोलीस स्टेशनला जाणवत होती ती बळप यांच्या रुपाने पूर्ण झाली आहे त्यांना आता प्रलंबित असणाऱ्या गुन्ह्यांची चौकशी सोबतच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा लागणार आहे तसेच तालुक्यात वाळूमाफियांना थोपवण्याचे आवाहन त्यांच्यापुढे आहे.
पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारताच त्याच दिवशी संध्याकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी येथे जाऊन भेट घेतली तालुक्यात चांगले काम करा लोकांच्या समस्यांना प्राधान्य द्या असे अण्णांनी त्यांना सांगितले यावेळी अण्णा हजारे यांच्यासोबत विविध विषयावर त्यांनी चर्चा केली अण्णा हजारे यांनी  त्यांचे स्वागत केले.
रविवारी त्यांनी कोहकडी येथे झालेल्या मंदिरातील चोरीच्या घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे फिरवली येथे चोरांनी मंदिरातील इन्वर्टर बॅटरी व साऊंड सिस्टिम चोरून नेले आहेत तो तपास पोलीस उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे करत आहेत त्यानंतर त्यांनी निघोज व आळकुटी या गावांना भेटी दिल्या तेथील माहिती जाणून घेतली तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गावांना भेटी देऊन सर्व भाग जाणून ग्राउंड लेव्हल वर जाऊन काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे निश्चितच तालुक्यात त्यांच्याकडून चांगले काम होण्याची अपेक्षा नागरिकांना आहे.

 तालुक्याची हद्द मोठी आहे  ग्राउंड लेव्हल जाऊन  काम करणार आहे तालुक्यातील सगळे अवैध धंदे पूर्णतः बंद करणार सावकारी व शेतकऱ्याच्या अनुषंगाने फसवणुकीचे गुन्हे वगैरे त्यावर त्वरित कारवाई केली जाणार महिला विषयीच्या तक्रारी ची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही गुंडगिरी व गाव गुंड स्वतःला अहम मानणारे त्यांच्याबद्दल नागरिकांनी स्वतः समोर येऊन तक्रारी द्याव्यात कोणाचीही भीती बाळगू नये नागरिकांनी पोलिसांशी घाबरून राहू नये तक्रार असेल तर त्वरित संपर्क साधावा.
----------
घनश्याम बळप
पोलीस निरीक्षक पारनेर