$type=ticker$snippet=hide$cate=0

भाजप-तृणमूलमधला जीवघेणा संघर्ष

   डाव्या-उजव्यांत कमालीची दरी आहे. दोन्ही विचारधारा परस्परविरोधी विचाराच्या आहेत. या दोन्ही विचारधारा आणि तत्त्वप्रणालींत टोकाचा मतभेद असला...


 



 डाव्या-उजव्यांत कमालीची दरी आहे. दोन्ही विचारधारा परस्परविरोधी विचाराच्या आहेत. या दोन्ही विचारधारा आणि तत्त्वप्रणालींत टोकाचा मतभेद असला, तरी त्याचा अर्थ एकमेकांची डोकी फोडावीत, असा नाही. केरळ, पश्‍चिम बंगाल आणि त्रिपुरा राज्यांत डावे आणि उजव्यांत संघर्ष झाला. डाव्यांशी संघर्ष करीत भाजपनं त्रिपुराची सत्ता मिळविली आता भाजपचं लक्ष्य आहे, ते पश्‍चिम बंगाल. 35 वर्षांनंतर डाव्यांची सत्ता उलथवून राज्य मिळविलेल्या तृणमूलला भाजप हेच आव्हान वाटत असून त्यातून आता दोन्ही पक्षांत रक्तरंजित संघर्ष सुरू झाला आहे.

लोकशाही मार्गानं राजकीय पक्षांनी अवश्य सत्ता मिळवावी. जनतेची कामं करून सत्ता टिकवावी, त्याला कुणाचाही विरोध असता कामा नये. कायदा हातात घेऊन, गुंडगिरी करून सत्ता मिळविता येत नाही. मिळाली, तरी ती जास्त काळ टिकत नाही. पश्‍चिम बंगालमध्ये डाव्यांची सत्ता होती, तेव्हा डावे कार्यकर्ते मतदान केंद्र बळकावणं, विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण करणं, त्यांना मारहाण करणं असे प्रकार करीत होते. डाव्यांच्या दांडगाईला जनता वैतागली होती. ती पर्याय शोधीत होती. दहा वर्षांपूर्वी जनतेच्या याच रागाचा फायदा उठवित तृणमूल काँग्रेसनं सत्ता मिळविली. लोकशाही मार्गानं सत्ता मिळविल्यानंतर तृणमूल काँग्रेसही डाव्यांच्याच वाटेवरून जायला लागली. विरोधकांचं खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्यावर हल्ले करणं, त्यांचे खून करणं असे प्रकार गेल्या काही वर्षांपासून तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरू केले आहेत. असा एकही महिना जात नाही, की त्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला होत नाही. भारतीय जनता पक्ष त्याविरोधात आंदोलन करतो; परंतु या आंदोलनालाही अनेकदा हिंसक वळणं लागली आहेत. लोकशाही मार्गावर तृणमूल आणि भाजप या दोन्ही पक्षांचा वरकरणी तरी विश्‍वास आहे; परंतु दोन्ही पक्षांच्या नेत्या, कार्यकर्त्यांचं वागणं हे खुनशीपणाचं आहे. एकीकडं तृणमूल काँग्रेसला राज्यात नीट काम करू न देणं, राज्यपालांचा उपयोग करून ममता बॅनर्जी यांच्या मार्गात अडथळे आणणं, ममता यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करणं आदी प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शारदा चिटफंड घोटाळ्याचा तपासाच्या नावाखाली तृणमूलचे काही खासदार, आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. आताही पाच खासदारांना आणि काही आमदारांना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राजीनामा द्यायला लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अन्य राज्यांत हे फोडाफोडीचं राजकारण खपून गेलं.पश्‍चिम बंगालमध्ये ते तसं खपण्याची शक्यता दिसत नाही. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. तृणमूल काँग्रेसमुळं राज्याची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचा आरोप करून तिथं राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजप करतो आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेण्याचं जसं समर्थन करता येणार नाही, तसंच लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या सरकारला नीट कामकाज करू न देणंही समर्थनीय नाही. भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचेच कार्यकर्ते हल्ले करीत आहेत, हा आरोप सातत्यानं भाजप करीत असला, तरी एकाही प्रकरणात भारतीय जनता पक्षाला तृणमूलवरील आरोप सिद्ध करता आलेला नाही. हे खरं असलं, तरी पश्‍चिम बंगाल पोलिसांनाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांवरील हल्ले रोखता आलेले नाहीत. पश्‍चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका पुढच्या वर्षी एप्रिल-मे मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या हल्ल्याचं भांडवल भारतीय जनता पक्षानं करायला सुरुवात केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाला यश मिळालं, त्या दिवशी कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममतादीदींचा नामोल्लेख टाळून पश्‍चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होणार्‍या हल्ल्यांचा उल्लेेख केला होता आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची दिशाही दाखविली होती. हा सारा प्रकार लक्षात घेता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खरं तर

कायदा व सुव्यवस्थेवर अधिक लक्षव द्यायला हवं होतं. भाजपच काय, कुणावरही हल्ले होणार नाहीत आणि असे हल्ले करणार्‍यांवर कडक कारवाईचा संदेश दिला गेला असता, तर हल्ले करण्याचं धाडस झालं नसतं. भारतीय जनता पक्षाच्या हातातील एक मुद्दा त्यांना काढून घेता आला असता. तसंच राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ममतादीदींना नाकारता येणार नाही. भाजपच काय कोणावरही हल्ले होणार नाहीत, याची दक्षता घेणं हे त्यांचं मुख्यमंत्री म्हणून काम आहेच; परंतु मतांच्या ध्रुवीकरणाच्या नादात त्यांनाही आपल्या जबाबदारीचा विसर पडलेला दिसतो. पश्‍चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होण्याबरोबरच भाजप कार्यकर्त्यांवर अनेकदा होणार्‍या हल्ल्यांंमुळं आता पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपनं केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली उद्धवस्त झाल्याचा भाजपचा आरोप आहे. बिहारमधील विजयानंतर भाजपनं आता आपला मोर्चा पश्‍चिम बंगालकडं वळवला आहे. राज्याचे भाजपध्यक्ष दिपील घोष यांच्या ताफ्यावर गुरुवारी दगडफेक झाल्यानंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याशिवाय निष्पक्षपणे निवडणूक घेता येणार नसल्याचं घोष यांनी म्हटलं आहे. घोष यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांसारखं पश्‍चिम बंगालमधील पोलिस वागत असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रपती राजवट राज्यामध्ये निष्पक्षपणे निवडणूक घेण्यासाठी लागू करावीच लागेल, असंही घोष यांनी म्हटलं आहे. निवडणुका पाच महिन्यांवर आल्या असताना अशी पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून दीदींच्या हाती आयतं कोलित देण्याचं धाडस भाजप करणार नाही. पश्‍चिम बंगालच्या विधानसभेमध्ये 294 जागा आहेत. भाजपला राज्यातील मागील विधानसभा निवडणुकांमध्ये चांगला फटका बसला होता. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं मागील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजेच 211, काँग्रेसनं 44, डाव्या पक्षांनी 26 तर भाजपनं केवळ तीन जागा जिंकल्या होत्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपनं 18 जागा जिंकून तृणमूल काँग्रेसपुढं आव्हान उभं केलं आहे. भारतीय जनता पक्षानं मिशन दोनशे हाती घेतलं असून त्यासाठी घोष आणि भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. घोष यांचा ताफा अलिपूरमार्गे जात असतानाच हा हल्ला झाला. या दगडफेकीमध्ये घोष यांच्या गाडीचं बरंच नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे या वेळी दिलीप घोष यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर पोलिसांचं वाहनदेखील होतं. 15 दिवसांच्या आत घोष यांच्या वाहन ताफ्यावर झालेला हा दुसरा हल्ला आहे.

या हल्ल्यामागं गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या विमल गुरुंग यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याची शक्यता भाजपनं व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत गोरखा जनमुक्ती मोर्चा भाजपबरोबर होता. भाजपनं फसवणूक केल्याचा आरोप करून हा मित्रपक्ष आता थेट तृणमूल काँग्रेसला जाऊन मिळाला आहे. घोष यांचा ताफा ज्या मार्गानं येत होता, त्याच मार्गावर गोरखा जनमुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलन करीत होते. घोष यांना या कार्यकर्त्यांनी काळे झेंडेही दाखवले. आंदोलनाचा काहीच परिणाम होत नसल्याचं पाहिल्यावर या कार्यकर्त्यांनी हिंसक होत गाडीवर दगडफेक केल्याचं भाजपचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी पश्‍चिम बंगालच्या दौर्‍यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही भाजपच्या कार्यकर्त्यांवर होणार्‍या हल्ल्यांसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. विजयवर्गीयही सातत्यानं कायदा व सुव्यवस्थेवरून ममतादीदींना धारेवर धरीत आहेत. भाजपचे कार्यकर्ते ममतादीदींना अटक करण्याची मागणी करीत आहे. ममतादीदींनीही याच मुद्द्यावर भाजपला थेट आव्हान दिलं असून अटक करून तर दाखवाच, तुरुंगातून निवडणूक लढवून भाजपला पराभूत करू, असं म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय जनता दलानं मिळविलेल्या यशाचा उल्लेख केला आहे. 

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5554,letest News,585,Loksabha-2019,164,Maharashtra,104,Mumbai,41,New Window,210,News,315,satara,8,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,138,अहमदनगर,9990,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,663,देश,4162,नाशिक,776,पुणे,599,बीड,1424,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15403,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12504,महाराष्ट्र सातारा,27,मुंबई,3450,विदेश,637,संपादकीय,1469,सातारा,3159,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: भाजप-तृणमूलमधला जीवघेणा संघर्ष
भाजप-तृणमूलमधला जीवघेणा संघर्ष
https://lh3.googleusercontent.com/-KmzAG-HzBPc/X79rPxe-73I/AAAAAAABlw8/tC65THNdJUoiblfm_1K-9gcitze9KqzAwCLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-KmzAG-HzBPc/X79rPxe-73I/AAAAAAABlw8/tC65THNdJUoiblfm_1K-9gcitze9KqzAwCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_402.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_402.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content