मुंबई : शरद पवार यांनी ज्योतिषी म्हणून उल्लेख केल्यानंतर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रावसाहेब दानवे यांनी तीन म...
मुंबई :
शरद पवार यांनी ज्योतिषी म्हणून उल्लेख केल्यानंतर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रावसाहेब दानवे यांनी तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार येईल असा दावा केला आहे. यासंबंधी शरद पवारांना विचारलं असता त्यांनी दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे माहिती नव्हतं असा टोला लगावला होता. रावसाहेब दानवे यांनी यावर बोलताना माझ्यावर टीका करण्याचा शरद पवारांना आधिकार असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
--------------------------