बोरगाव : भाजपच्या मोदी सरकार च्या शेतकरी कामगार विरोधी धोरण हाणून पाडण्यासाठी 26 नोव्हेंबर 2020 रोजी माजी आमदार जे. पी .गावीत यां...
बोरगाव :
भाजपच्या मोदी सरकार च्या शेतकरी कामगार विरोधी धोरण हाणून पाडण्यासाठी 26 नोव्हेंबर 2020 रोजी माजी आमदार जे. पी .गावीत यांच्या नेतृत्वाखालील देशव्यापी रास्ता रोको बोरगाव येथे आयोजित केला, या रास्ता रोको आंदोलनात माकप ची किसान सभा, DYFI युवकांची संघटना, SFI विद्यार्थी संघटना, जणवादी महिला संघटना, आशा वर्कर्स, कामगार संघटना, शेतकरी संघटना, बांधकाम संघटना, बैंक कर्मचारी, शिक्षक संघटना व इतर अनेक संघटना या संपात सहभागी झाल्या. संप जवळपास सकाळी 11 ते 02 वाजेपर्यंत सुरू होता.यावेळी 4000 ते 5000 च्या जवळपास आंदोलक उपस्थित होते.
यावेळी माकप चे सेक्रेटरी सुभाष चौधरी, जनार्दन भोये, तुळशीराम खोटरे, यांनी अंदोलन कर त्यांना मार्गदर्शन केले.
जे .पी .गावीत यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की मोदी सरकारने शेतकरी कामगार यांच्या विरोधी कायदे करुन आपल्या शेतकरी कामगार मजुर यांच्या विरोधी कायदे करुन मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहे. याचा प्रखर विरोध जनतेला करावा लागेल.
कोरोना रोखण्यासाठी हे शासन अपयशी ठरल्याने देशातील सबंध नागरिकांची मोठी नुकसान केली आहे, वनाधिकार कायदा झाला आहे तरी वनजमिन धारक आदिवासी जनतेला वर्षानुवर्ष वंचित ठेवले आहे. अवकळी पावसाने शेतीची जी नुकसान झाली त्याची भरपाई मिळावी. गरिब जनतेला खावटी मंजूर करुन तत्काळ ती द्यावी. प्रत्येक कुटुंबाला जॉब कार्ड देऊन मागेल त्याला काम द्यावे. शेतकऱ्यांच्या सहमतीने धरणांचे व्यवस्थापन करावे.
शेतकरी, बगायतदार यांची लाईट बिले जास्त देऊन मोठ्या संकटात टाकले आहे. ही वाढीव बिले रद्द केली पाहीजे. "ड" यादीतील सर्व गरजू लाभधारक कुटुंबांना सर्रास घरे देण्यात यावे. वंचित राहीलेल्या गरजू लोकांना "ड" यादीत समाविस्ट करा. शबरी आवास योजना लाभार्थ्यांना लाभ द्या. धरणे बांधून घरे गावे बडवून गरिब आदीवासी जनतेला विस्थपित करु नये. नाशिक जिल्ह्यातील 154 गावे सैंसेटिव्ह झोन मधे टाकुन गरिब जनतेवर मोठा अन्याय केला आहे. गरिब निराधार वृध्द व्यतिंना 2500 रुपया पर्यंत वाढीव पेंशन ध्या. पिकला हमिभाव द्यवा असे आवाहन केले. मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या शहीद जवानांना माजी आमदार जे. पी. गावीत यांनी आंदोलन कार्यकर्त्यांनी क्रांतीकरी लाल सलाम देत भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी सभापती मनिषा महाले, पुंडलिक भोये, संदीप भोये अशोक भोये, भरत भोये, खन्डू भोये, बाळा भोये यशवंत पवार, हरी कडाळी, सोमनाथ दळवी, भगवान गांगुर्डे, हिरा गवित, खुशाल शिंदे, बयाजी धुळे, डिगु भोये, लक्ष्मण बोरसे , मधू जोपले, आनंदा भोय, कृष्णा गायकवाड़, धर्मा पवार, मनोहर गायकवाड़, सोमनाथ गवळी, रंगणाथ पवार, डी.गवळी ,पुनाजी गवळी , भिमा पाटिल, सुरेश गवळी, राहुल अहेर,
विजया घांगळे, दनियल गांगुर्डे, वसंत बागुल, तसेच तालुक्यातील माकप चे सर्व कार्यकर्ते , नागरिक,सरपंच, उप सरपंच, कार्यकर्ते होते.
यावेळी सुरगाणा येथील पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे, पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे, पराग गोतुर्णे, संतोष गवळी,राहुल जोपळे यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.