Breaking News

देवेंद्र फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यानेच बिहार निवडणुकीत यश दिसून येतंय - बावनकुळे

 


नागरपूर : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार भाजप-जेडीयू यांच्या युतीने आघाडी घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा करिष्मा चालणार असून महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलद्वारे केला होता. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांमधील चित्र जवळपास तसेच होते. मात्र १० वाजेनंतर आता दुपारी ४.०० वाजेपर्यंत एनडीए अर्थात नितीश कुमार यांनी आघाडी कायम ठेवली आहे.

भाजपने बिहारच्या निवडणुकांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत त्यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती. यावेळी महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्षनेत्याच्या जबादारी सोबतच बिहारमधील प्रचाराची जबाबदारी देखील पार पडली होती. यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लग्न झाली होती. सद्या त्यांनी कोरोनावर मात केली असली तरी स्वतःला विलगीकरणात ठेवलं आहे.

भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष बनेल असं चित्र सद्या उभं होत आहे."बिहार निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपनं संघटन उभारलं आणि पाच वर्षांत जे काम झालं. त्याचा परिणाम निकालावर झालेला दिसतो आहे. एनडीएला जनतेने भरभरून मते दिली आहेत. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएची सत्ता पुन्हा येणार असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसून येत आहे." असं भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बिहारच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसच – प्रसाद लाड

बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच यश आणि विजयाचं श्रेय भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं. त्यामुळे हे देवेंद्र फडणवीस यांचंही यश आणि विजय आहे. काही तासातच एनडीए 130 च्या वर जाईल आणि महागठबंधन 100 च्या खाली येईल, असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.